मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील ही झोप महागात पडू शकते.
गाडीने प्रवास म्हटलं की डुलकी किंवा झोप आलीच. ऑफिससाठी दररोज प्रवास करणारे कितीतरी प्रवासी प्रवासात झोपतात. पण मेट्रोमध्ये अशी झोप काढणं तुम्हाला महागात पडू शकतं. अशी एक मेट्रो आहे ज्यात तुम्हाला झोपण्यास मनाई आहे.


चुकूनही तुम्ही झोपलात तर तुम्हाला दंड बसू शकतो. थोडाथोडका नव्हे तर हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. मेट्रोमध्ये प्रवास करताना जमिनीवर बसणं, आडवं होणं, गेटसमोर उभं राहणं किंवा बसणं, सीटवर पाय वर करून बसणं, सीट झोपणं यास सक्त मनाई आहे.


हा नियम दुबई मेट्रोचा आहे. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका प्रवाशाच्या पोस्टनंतर, दुबई मेट्रोचे हे नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. दुबई मेट्रोच्या नियमांनुसार, प्रवास करताना जर तुम्ही जमिनीवर बसलात किंवा झोपलात तर तुम्हाला १०० ते ३०० दिरहमपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय रुपयात ही रक्कम सुमारे २,५०० ते ७,५०० रुपये आहे.

Comments
Add Comment

निमंत्रण धुडकावल्याने २०० टक्के टॅरिफ लादणार

‘गाझा बोर्ड ऑफ पीस’वरून ट्रम्प यांची फ्रान्सला धमकी वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ

ट्रम्पनी शेअर केला अमेरिकेचा नवा नकाशा, नकाशात कॅनडा आणि ग्रीनलँडचा समावेश

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला आहे. या नकाशात ट्रम्प यांनी कॅनडा आणि

ट्रम्प वाढवताहेत जागतिक अस्वस्थता

अमेरिकेचे विक्षिप्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील, कौतुक करता करता कधी पायाखाली घेतील, याचा

अयातुल्ला खाेमेनी यांच्यावर हल्ला म्हणजे थेट युद्धाला आमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचा इशारा तेहरान : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणचे सर्वोच्च नेते

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज,

अफगाणिस्तान : काबुलमध्ये स्फोट, सात ठार

काबुल : अफगाणिस्तानमध्ये काबुलजवळ शहर ए नॉ जिल्ह्यात सोमवारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात किमान सात जणांचा