फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, थोडी जरी शंका असती..

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणात डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिला मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख करत प्रशांत बनकर याचे नाव घेतले होते. पोलिसांनी तत्काळ प्रशांत बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना अटक केली असून बदने यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेवरून भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर काहीं कडून आरोप करण्यात आले, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.


फडणवीस म्हणाले, “परवा आमची एक लहान बहिण जी डॉक्टर होती, तिचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली आणि तिच्या हातावरच आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून सत्य बाहेर येत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत या भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”


राजकीय आरोपांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न होतो आहे. काहीही कारण नसताना रणजित दादा आणि सचिन दादांचं नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द केला असता.” फडणवीस पुढे म्हणाले, “जिथे माझ्या धाकट्या बहिणीचा विषय आहे, तिथे मी कोणतीही तडजोड करणार नाही. पण जर कोणी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खात असेल आणि राजकारण करत असेल, तर तेही मी सहन करणार नाही.” मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं असून तपास पूर्णपणे निःपक्षपाती पद्धतीने होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

वसई : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून