आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. हा नवीन नियम १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. नामांकन प्रक्रिया संपूर्ण बँकिंग प्रणालीमध्ये सुलभ आणि एकसमान करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. जेणेकरून दाव्यांचा निपटारा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. बँकिंग कायदे (दुरुस्ती), 2025 अंतर्गत नामांकनाशी संबंधित हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे.


नॉमिनीच्या मृत्यूनंतरही अनेक खातेदार नॉमिनीचे नाव बदलत नाहीत. जर खातेदाराचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर खात्यातील रक्कम कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचवण्यात खूप अडचणी येतात. अशा परिस्थितीत अनेक प्रकारची कागदपत्रे पूर्ण करावी लागतात. यासाठी बराच वेळ लागतो. मात्र आता चार नॉमिनेट व्यक्तींचा हा नियम अशा वादांपासून संरक्षण करेल.





बँक ग्राहक आता एकाच वेळी किंवा आळीपाळीने चार जणांना नॉमिनेट करू शकतात. यामुळे ठेवीदार आणि त्यांच्या नॉमिनेट व्यक्तींसाठी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. तसेच पहिल्या नामनिर्देशित व्यक्तीच्या मृत्यूनंतरच पुढील उमेदवार सक्रिय होईल अशी व्यवस्था केली जाईल. जर बँक ग्राहकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर बँकेत जमा केलेली रक्कम नॉमिनीला दिली जाईल जो सक्रिय असेल. यामुळे दाव्यांचा निपटारा करताना उत्तराधिकाराचे सातत्य आणि स्पष्टता राखली जाईल.लॉकरसाठी देखील हाच नियम जारी करण्यात येणार आहे.



नॉमिनी बद्दलचा हा नवीन नियम ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जर एखाद्या ठेवीदाराचा मृत्यू झाला तर त्याने नॉमिनेट केलेल्या व्यक्तीला पैसे किंवा मालमत्ता सहज मिळू शकते. पूर्वी ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती, परंतु आता ती सोपी करण्यात आली आहे.विशेषत: ज्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य आहेत, त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे