रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासोबतच महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


येथील जयशंकर लॉन्स येथे आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार भास्कर भगरे, आमदार प्रवीण तायडे, आमदार अमोल जावळे, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा, महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडेबाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे, प्रकाश नन्नावरे, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री .फडणवीस म्हणाले, सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. त्यांनी आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली, महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजविण्याचे कामही केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले.



या काळात तयार झालेल्या साहित्यातून समकालिन महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, संस्कृतीची माहिती मिळते. ते सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा आहे. विविध आक्रमणे होऊनही महानुभाव विचार समाजात रुजूला. हा पंथ राज्य, देश आणि अफगाणपर्यंत विस्तारला आहे. या परंपरेने समतेचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची आहे.


भगवान चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजात प्रभू श्रीकृष्ण यांनी गीतेतून दिलेला विचार रुजविला, तोच संदेश समाजाला दिला. त्यांनी समाजाला सन्मार्गावर आणले. समाजात भेदाभेद, विषमता निर्माण झालेली असताना संपूर्ण समाजाला महानुभाव विचारातून एकसूत्रात बांधत त्यांना सन्मार्ग दाखविण्याचे काम चक्रधर स्वामी यांनी केले. मुख्यमंत्री झाल्यावर महानुभाव पंथाच्या स्थळांचा विकास सुरू केला, असेही फडणवीस म्हणाले.


कारंजेकर म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यामुळे महानुभाव परिषदेचे विविध उपक्रम मार्गी लागले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला. यावेळी महानुभाव परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. माजी आमदार सानप यांनी प्रास्ताविक केले.

Comments
Add Comment

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण

धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली

बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा

पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे' बदल

पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव

इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांचा हल्ला

काळे झेंडे दाखवत नाराजांचा राडा छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट