नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच वैमानिकाला काहीतरी तांत्रिक गडबड असल्याचे जाणवले यामुळे विमान परत नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. वैमानिकाच्या या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. या विमानात एकूण १६० प्रवासी होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांचे तिकीटाचे पैसे परत देण्यात येणार आहेत.
एअर इंडियाच्या नागपूर-दिल्ली (विमान क्रमांक एआय ४६६) या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच काही अंतरावर पक्षी धडकल्याचा प्रकार शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडला. यावेळी पायलटच्या प्रसंगावधनाने कुठलीही दुर्घटना घटली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात राज्य ...
एखादा पक्षी विमानाला धडकला असावा, अशी शक्यता व्यक्त करत वैमानिकाने विमान परत नागपूर विमानतळावर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, येथील एटीसीशी संपर्क साधण्यात आला. हे विमान हिंगण्याच्या दिशेने सुराबर्डी, फेटरी, कळमेश्वर, सावनेरपर्यंत पोहचले होते. तेथून पाटणसावंगी, कोराडी, कामठी या मार्गाने विमान नागपूर विमानतळावर उतरले. वैमानिकाने घेतलेल्या निर्णयामुळे दुर्घटना टळली.
यापूर्वी २ सप्टेंबर २०२५ रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या नागपूर-कोलकाता विमानाला पक्षी धडकला होता. त्यानंतर लगेच दोन महिन्यांत हा दुसरा प्रकार घडला आहे.