दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण वाटतं. मात्र, काहीजण एक एक करत न मोजता पोळ्या खातात आणि याच सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आवश्यकतेपेक्षा जास्त पोळ्या खाल्ल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, असे तज्ज्ञ सांगतात.



जास्त पोळ्या खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम


गव्हाच्या पिठामध्ये कार्बोहायड्रेटचे म्हणजेच कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त पोळ्या खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त कार्बोहायड्रेट साचते आणि वजन वाढते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर पोळ्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. तसेच, जास्त गव्हाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचा स्तर वाढतो, जे मधुमेही रुग्णांसाठी घातक ठरू शकते.


याशिवाय, गव्हात असणाऱ्या ग्लुटन नावाच्या प्रोटीनमुळे काहींना गॅस, पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो. रात्रीच्या वेळी जास्त पोळ्या खाल्ल्यास या समस्या अधिक वाढतात. तसेच, जर आहारात भाज्या आणि फळांचे प्रमाण कमी असेल आणि फक्त पोळ्यांवर अवलंबून राहिलात, तर फायबरच्या अभावामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.



एका दिवसात किती पोळ्या योग्य?


तज्ज्ञांच्या मते, एका गव्हाच्या पोळीत सुमारे १७ ग्रॅम कार्बोहायड्रेट असते आणि ती साधारण ७० कॅलरीज देते. त्यामुळे प्रौढ व्यक्तीसाठी दिवसाला २ ते ३ पोळ्या खाणे आरोग्यासाठी योग्य मानले जाते. मात्र हे प्रमाण तुमच्या शारीरिक क्रियाशीलता, वय, लिंग आणि वजनावर अवलंबून बदलू शकते.


थोडक्यात सांगायचं झालं तर, वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, पचन सुधारायचं असेल आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर पोळ्यांचे प्रमाण मर्यादित ठेवा. संतुलित आहारात डाळ, भाजी, फळं आणि पुरेसं पाणी यांचाही समावेश असावा. त्यामुळेच खरं आरोग्य टिकून राहील.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे