एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या सामुहिक आत्महत्येत एकूण पाचजणांचा समावेश होता. ज्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर चारजणांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पनवेल तालुक्यामधील जावळे गावामध्ये घडली. या घटनेसंबंधी उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करित आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे कुटुंब मूळचे नेपाळचे असून पनवेलमधील जावळे गावात अनेक दिवसांपासून राहत होते. मागील दोन ते तीन दिवसापासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे शेजारच्यांना काहीतरी घडल्याचा संशय आल्याने त्यांनी यासंबंधींची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. सुरक्षा यंत्रणा तात्काळ संबंधीत जागी पाचारण झाली. त्यावेळी घरात सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले.




सुरक्षा यंत्रणेतील जवानांनी तातडीने या सर्वांना उपचारासाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा संतोष बिरा लूहार (वय २२) याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बेशुद्ध अवस्थेतील रमेश बिरा लोहार (वय २३), त्यांची पत्नी बसंती व पाच वर्षांचा मुलगा आयुष आणि दोन वर्षांचा आर्यन यांच्यावर उपचार सुरू झाले. अतिदक्षता विभागाची गरज असल्याने या चौघांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन