मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४ ऑक्टोबर, २०२५ ते १ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत असणार आहे. नॉन-इंटरलॉकिंग नंतरची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर डे ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे कर्जत-खोपोली मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

२४ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून दुपारी १ वाजून २० मिनिटांपर्यंत दोन तास ब्लॉक असणार आहे. तर २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असा साडेचार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.




ब्लॉकच्या कालावधीत कर्जत ते खोपोली दरम्यान कोणतीही उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध असणार नाही. त्यामुळे कर्जत वरून खोपोलीला जाणारी दुपारी १२ वाजताची आणि १ वाजून १५ मिनिटांची लोकल बंद राहणार आहे. तर खोपोलीहून कर्जतला येणारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांची आणि दुपारी १२ वाजून ४० मिनिटांची लोकल बंद राहणार आहे.


रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

Comments
Add Comment

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त

Mumbai Mayor : त्यांनी पेंग्विन आणला, आम्ही सिंह आणणारच; महापौर स्वत: अधिकाऱ्यांसह गुजरातला जाणार

पेंग्विन खाली मान करून उभे असतात म्हणून पहायला आवडतात मुंबई : भायखळा येथील राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात