१ नोव्हेंबर २०२५ पासून बँकिंग अधिनियम कायद्यात मोठे फेरबदल तुमच्या खात्यावर काय परिणाम होणार जाऊन घ्या....

प्रतिनिधी: १ नोव्हेंबर २०२५ पासून बँकिंग(सुधारणा) कायदा, २०२५ अंतर्गत नवीन नियम लागू होणार आहेत. बँकेच्या नवीन नियमावलीत काही महत्वपूर्ण बदल होतीत त्यातील एक प्रमुख बदल म्हणजे बँक ग्राहक आता ४ नामांकन (Nominee) ठेऊ शकतील. त्यामुळे ग्राहकांच्या मृत्यूपश्चात अथवा अडीअडचणीला ठेवीदारांना त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत त्यांचे पैसे किंवा मौल्यवान वस्तू कोणाला मिळतील हे ठरवणे सोपे होणार आहे. १५ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचित केलेल्या या कायद्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, बँकिंग नियमन कायदा, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा आणि बँकिंग कंपन्या कायद्यांसह अनेक बँकिंग कायद्यांमध्ये १९ सुधारणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की नामांकनांशी संबंधित कलम १०, ११, १२ आणि १३ १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होतील. या कलमांमध्ये ठेव खाती, सुरक्षित कस्टडी आयटम आणि लॉकर सामग्री समाविष्ट आहे.


यापूर्वी, दुरुस्ती कायद्यातील काही इतर तरतुदी १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाल्या होत्या. या कायद्याचा उद्देश एकूणच प्रशासन सुधारणे, ठेवीदार आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ऑडिट मजबूत करणे आणि बँकिंग अधिक ग्राहक-अनुकूल बनविणे आहे असे यावेळी सरकारने स्पष्ट केले आहे.


महत्वाचा बदल म्हणजे एकाच वेळी किंवा एकामागून एक चार लोकांना नामांकित करू शकता तसेच ठेवीवर तुम्ही एकाच वेळी नामांकने (सर्व नामांकित व्यक्तींना निश्चित शेअर मिळतो) किंवा सलग नामांकने म्हणजे आधीच्या नामांकित व्यक्तीचे निधन झाल्या सच पुढील नामांकन सक्रिय होते या दोन्हीपैकी अथवा दोन्ही तुम्ही पर्याय निवडू शकता. तसेच एकाच वेळी नामांकनांसाठी, तुम्ही नामांकित व्यक्तींमध्ये एकूण हक्क विभागू शकता जेणेकरून एकूण रक्कम १००% पर्यंत रक्कम विभागू शकणार आहात. सुरक्षित ताबा आणि लॉकर सुविधांमध्ये असलेल्या वस्तूंसाठी फक्त सलग नामांकनांना परवानगी आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार हे अधिक स्पष्ट आणि संरचित उत्तराधिकार सुनिश्चित करणार आहे. तसेच दावेदारांमधील वाद देखिली कमी होईल असे नियामकांचे मत आहे.


बँकिंग कंपन्या (नामांकन) नियम, २०२५ लवकरच प्रकाशित केले जातील ज्यामध्ये नामांकने करण्यासाठी किंवा अद्यतनित करण्यासाठी फॉर्म आणि प्रक्रिया लिखित स्वरूपात स्पष्ट करण्यात येतील. ग्राहकांसाठी हे बदल कौटुंबिक किंवा आर्थिक परिस्थितीनुसार विद्यमान नामांकनांचे पुनरावलोकन (Review) आणि अद्यतनित (Update) करण्याची संधी उपलब्ध करून देतात. ठेवीदार आता अनेक लाभार्थ्यांसाठी योजना आखू शकतात, जेणेकरून त्यांचे निधी, मौल्यवान वस्तू किंवा सुरक्षित ताबा वस्तू कायदेशीर गुंतागुंतीशिवाय त्यांच्या इच्छेनुसार वितरित केल्या जाऊ शकतील असे नव्या नियमनात स्पष्ट केले गेले आहे.

Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

सिंहस्थ कुंभमेळा जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताला अधोरेखित करणार

५,७५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार