सध्याच्या परिस्थितीतील सोन्यात नफा उचलण्यासाठी चॉइस म्युच्युअल फंडकडून नवा Gold ETF फंड लाँच!

प्रतिनिधी:जागतिक परिस्थितीतील सोन्यातील वाढीचा लाभ उठवण्यासाठी गुंतवणूकदारांना एक नवा पर्याय प्राप्त होणार आहे. चॉइस म्युच्युअल फंडने आज त्यांच्या गोल्ड ईटीएफ फंड लाँचची घोषणा केली ज्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्या साठी परवडणारा आणि सुरक्षित मार्ग मिळेल.नवीन फंड ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत खुली राहणार आहे. चॉइस गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) गुंतवणूकदारांना कमोडिटीतील (सोन्यातील) दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेचा फायदा घेण्यासाठी एक सोपा, सुरक्षित आणि तरल मार्ग प्रदान करेल, असे चॉइस म्युच्युअल फंडने आपल्या निवेदनात आज म्हटले आहे.


ही ओपन-एंडेड योजना असणार आहे. विशेषतः देशांतर्गत सोन्याच्या किमतींनुसार परतावा निर्माण करण्याचा प्रयत्न फंड करणार असून भौतिक सोन्याला हा तरलता देणारा पर्याय गुंतवणूकदारांना मिळणार आहे. एनएफओ (New Fund Offer NFO) दरम्यान किमान गुंतवणूक १००० रूपयांची अनिवार्य करण्यात आली आहे आणि बंद झाल्यानंतर एका आठवड्यात हा फंड बीएसई आणि एनएसई वर सूचीबद्ध केला जाईल असेही त्यात स्पष्ट केले गेले आहे. गोल्ड ईटीएफ गुंतवणूकदारांना भौतिक साठवणुकीचा कोणता ही धोका नाही परंतु हे साधन भौतिक सोन्याचे समान बाजार मूल्य आणि वाढीची क्षमता वेळोवेळी देते.


'भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या युगात, ही सर्वोत्तम मालमत्ता वर्गांपैकी एक आहे जी एखाद्याच्या पैशाची सुरक्षितता सुनिश्चित करते आणि सततची महागाई आणि बाजारातील अस्थिरतेवर मात करून दीर्घकालीन परतावा देण्याची क्षमता आहे' अ से चॉइस म्युच्युअल फंडचे सीईओ अजय केजरीवाल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. माहितीप्रमाणे, भौतिक सोने (Physical Gold) आणि सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून खर्चापूर्वी आणि ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन राहून सोन्याच्या देशांत र्गत किमतीशी जवळून जुळणारे परतावे प्रदान करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.


ही योजना कोणत्याही योजना/पर्यायांची ऑफर देत नाही. एकरकमी (Lumpsum) खरेदीसाठी किमान अर्ज रक्कम १००० रूपये आणि त्यानंतर १ रूपयांच्या पटीत हा फंड असेल. फंड सोने आणि सोन्याशी संबंधित साधनांमध्ये ९५-१००% आणि रोख, रोख सम तुल्य (Equvivalent) आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, रिव्हर्स रेपो आणि/किंवा सरकारी सिक्युरिटीज आणि/किंवा ट्रेझरी बिलांवर आणि/किंवा देशांतर्गत म्युच्युअल फंडांच्या लिक्विड स्कीमच्या युनिट्समध्ये ०-५% वाटप करेल असे फंड मॅनेजरकडून स्पष्ट करण्यात आले.


फंड हाऊसच्या मते, हा फंड दीर्घकालीन भांडवलवृद्धी शोधणाऱ्या आणि सोन्याच्या स्थानिक किमतीप्रमाणेच परतावा मिळवून देण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये फंड हाऊसला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सेबीची मान्यता मिळाली. फंडाच्या रिस्कोमीटरनुसार, फंडमध्ये गुंतवलेले मूळ 'उच्च जोखीम' (High Risk) वर असेल. त्यामुळे मिळालेल्या परवानगीनंतर चॉईस आता त्यांच्या अँसेट मॅनेजमेंट कंपनीचे कामकाज सुरू करणार आहे. सध्या इंडेक्स फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) सारख्या निष्क्रिय (Passive Fund) गुंतवणूक उत्पादनांपासून धोरणात्मक आणि टप्प्याटप्प्याने सुरुवात होईल, असे फंड हाऊसने सेबीची मंजुरी मिळाल्याच्या प्रसंगी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. फंडाची कामगिरी सोन्याच्या स्थानिक किमतीच्या तुलनेत मोजमाप केली जाणार आहे. आणि माहितीनुसार रोचन पटनायक या ईटीएफ फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक