सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडील सोन्याच्या साठ्यात ८८० मेट्रिक टनांपेक्षा अधिक वाढ

मुंबई:आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा ८८० मेट्रिक टनांपेक्षा जास्त झाला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आरबीआयने ०.२ मेट्रिक टनांची भर घातली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या ताज्या आकडेवारीनुसार,२६ सप्टेंबर २०२५ पर्यंत सोन्याचे एकूण मूल्य ९५ अब्ज अमेरिकन डॉलर्स होते. जागतिक भूराजकीय अस्थिरतेच्या वाढत्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी अलिकडच्या काही महिन्यांत वाढत आहे.या च अस्थिरतेत मोठ्या प्रमाणात सोन्याच्या मागणीतही वाढ झाल्याने सोने किंमत उसळली होती. मात्र रुपयांच्या घसरण मर्यादित करण्यासाठी आरबीआयने वेळोवेळी मार्केट ऑपरेशन करते. त्यामुळे आरबीआयकडून सोन्याच्या खरेदीत सातत्याने वाढ होत आहे.


सप्टेंबरमध्ये संपलेल्या सहा महिन्यांत, आरबीआयने ०.६ मेट्रिक टन (६०० किलोग्रॅम) सोने खरेदी केले आहे. आरबीआयच्या ताज्या बुलेटिननुसार, सप्टेंबर आणि जूनमध्ये अनुक्रमे एकूण ०.२ मेट्रिक टन (२०० किलो) आणि ०.४ मेट्रिक टन (४०० किलो) सोने खरेदी करण्यात आले. सप्टेंबरअखेर आरबीआयकडे असलेले एकूण सोन्याचे साठे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरीस ८७९.५८ मेट्रिक टन होते, जे सप्टेंबरअखेर ८८०.१८ मेट्रिक टन झाले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान, आरबीआयने ५४.१३ मेट्रिक टन सोने सं कलन केले होते.


जागतिक आर्थिक आणि भूराजकीय अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत वाढ, ज्यामुळे सुरक्षित आश्रय खरेदीला प्रोत्साहन मिळाले आणि केंद्रीय बँका आणि गुंतवणूकदारांकडून आर्थिक मालमत्ता म्हणून सोन्याची मागणी कायम राहिली, यामुळे देशां तर्गत किमतीत वाढ झाली, असे बुलेटिनमध्ये म्हटले आहे. जागतिक स्तरावर, बुलेटिनमध्ये असेही म्हटले आहे की मध्यवर्ती बँकांनी अधिकृत साठ्यात १६६ टन सोने जोडले, ज्यामुळे त्याची मागणी आणखी वाढली.तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या किमती वाढल्या, स प्टेंबरमध्ये हा आतापर्यंतचा उच्चांक होता.

Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

Iran-US-Israel War : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चक्क बॅकफूटवर; अमेरिकेने इराणी कच्च्या तेलाच्या खरेदीवर दिली ३० दिवसांची सूट

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणच्या तेल खरेदीवरील

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

भोंदूबाबा अशोक खरातवर उबाठाची 'कृपादृष्टी'!

शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी वळवले 'कॅप्टन'च्या संस्थेला; ३१ जुलै २०२० रोजी काढला जीआर मुंबई : नाशिकच्या

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर