Thursday, October 23, 2025
Happy Diwali

सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडील सोन्याच्या साठ्यात ८८० मेट्रिक टनांपेक्षा अधिक वाढ

सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडील सोन्याच्या साठ्यात ८८० मेट्रिक टनांपेक्षा अधिक वाढ

मुंबई:आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा ८८० मेट्रिक टनांपेक्षा जास्त झाला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आरबीआयने ०.२ मेट्रिक टनांची भर घातली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या ताज्या आकडेवारीनुसार,२६ सप्टेंबर २०२५ पर्यंत सोन्याचे एकूण मूल्य ९५ अब्ज अमेरिकन डॉलर्स होते. जागतिक भूराजकीय अस्थिरतेच्या वाढत्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी अलिकडच्या काही महिन्यांत वाढत आहे.या च अस्थिरतेत मोठ्या प्रमाणात सोन्याच्या मागणीतही वाढ झाल्याने सोने किंमत उसळली होती. मात्र रुपयांच्या घसरण मर्यादित करण्यासाठी आरबीआयने वेळोवेळी मार्केट ऑपरेशन करते. त्यामुळे आरबीआयकडून सोन्याच्या खरेदीत सातत्याने वाढ होत आहे.

सप्टेंबरमध्ये संपलेल्या सहा महिन्यांत, आरबीआयने ०.६ मेट्रिक टन (६०० किलोग्रॅम) सोने खरेदी केले आहे. आरबीआयच्या ताज्या बुलेटिननुसार, सप्टेंबर आणि जूनमध्ये अनुक्रमे एकूण ०.२ मेट्रिक टन (२०० किलो) आणि ०.४ मेट्रिक टन (४०० किलो) सोने खरेदी करण्यात आले. सप्टेंबरअखेर आरबीआयकडे असलेले एकूण सोन्याचे साठे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरीस ८७९.५८ मेट्रिक टन होते, जे सप्टेंबरअखेर ८८०.१८ मेट्रिक टन झाले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान, आरबीआयने ५४.१३ मेट्रिक टन सोने सं कलन केले होते.

जागतिक आर्थिक आणि भूराजकीय अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत वाढ, ज्यामुळे सुरक्षित आश्रय खरेदीला प्रोत्साहन मिळाले आणि केंद्रीय बँका आणि गुंतवणूकदारांकडून आर्थिक मालमत्ता म्हणून सोन्याची मागणी कायम राहिली, यामुळे देशां तर्गत किमतीत वाढ झाली, असे बुलेटिनमध्ये म्हटले आहे. जागतिक स्तरावर, बुलेटिनमध्ये असेही म्हटले आहे की मध्यवर्ती बँकांनी अधिकृत साठ्यात १६६ टन सोने जोडले, ज्यामुळे त्याची मागणी आणखी वाढली.तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या किमती वाढल्या, स प्टेंबरमध्ये हा आतापर्यंतचा उच्चांक होता.

Comments
Add Comment