Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा ₹१५०० चे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेत काही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. अनेक पुरुषांनी तसेच निकषात बसत नसलेल्या काही महिलांनीही या योजनेतून पैसे घेतल्याचे उघड झाले होते. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने सर्वच महिलांना ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले होते. मात्र, आता राज्य सरकारने या ई-केवायसीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



७० लाख महिलांना अपात्रतेची भीती असताना e-KYC ला तात्पुरती स्थगिती


महायुती सरकारने (Mahayuti Government) भाऊबीजेच्या सणाच्या तोंडावर राज्यातील 'लाडक्या बहिणींची' (Ladki Bahini) नाराजी दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा (₹२.५ लाख) जास्त आहे का, याचा शोध सुरू होता. या तपासणीत महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात होती. या तपासणीमुळे राज्यातील ७० लाखांहून अधिक महिलांना 'अपात्र' ठरवले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, आता सरकारने ई-केवायसीच्या सक्तीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सरकारचा 'बहिणींना' दिलासा


सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या काळात महिला वर्गाची नाराजी ओढवून घेणे योग्य नाही, या विचारातून सरकारने तूर्तास e-KYC ची सक्ती थांबवली आहे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, आता पुढे आणखी काही महिने महिलांना हे अर्थसहाय्य मिळत राहील, असे सध्या म्हटले जात आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट २०२५ पर्यंत १४ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे, ज्यामुळे राज्यातील महिलांना मोठी आर्थिक मदत मिळाली आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन शनिवार, दि. २५ ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित

ठाणे स्टेशनजवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; 'टकल्या' ऊर्फ नितेश शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल, शोध मोहीम सुरू

ठाणे: कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला आज पहाटेच्या सुमारास ठाणे स्टेशनजवळील परिसरात एका सराईत

'महायुती' सरकारचा मोठा राजकीय 'गेम'; ५४ आमदारांच्या मतदारसंघांसाठी राज्य सरकारचे २७० कोटी

मुंबई: राज्यातील सत्ताधारी 'महायुती' सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा राजकीय

तुमच्या खिशातली ५००ची नोट खरी आहे की नकली? हा धक्कादायक प्रकार ऐकून पायाखालची जमीनच सरकेल!

अमरावती: सावधान! तुमच्या हातात येणारी प्रत्येक ५०० रुपयांची नोट खरी आहे की, बनावट? कारण, अमरावती जिल्ह्यात बनावट