महिला विश्वचषक : सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक

नवी मुंबई : २०२५ महिला विश्वचषक एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत फक्त एकच स्थान शिल्लक असताना, गुरुवारी डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना दोन्ही संघासाठी करो या मरोचा मुकाबला ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आधीच अंतिम चार संघांसाठी पात्र ठरले आहेत. आता, भारत आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानासाठी आमनेसामने येतील. दोन्ही संघांचे गुण समान आहेत. पण नेट रन रेटवर भारत न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे आणि पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग तीन पराभवांमधून धडा घेईल. जर भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडला पराभूत केले तर ते उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनेल. पण जर ते हरले तर त्यांना पुढील सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला हरवावे यासाठी प्रार्थना करावी लागेल आणि बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवणे देखील आवश्यक असणार आहे.

भारताच्या अलीकडील पराभवांमुळे त्यांच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतील कमकुवतपणा उघड झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने भारतीय गोलंदाजांच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला. तर इंदूरमधील इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या मानसिक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण संघाला ५४ चेंडूत ५६ धावांची आवश्यकता होती. पण ते लक्ष्य गाठण्यात संघ अपयशी ठरला होता.

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर स्मृती मानधना पुन्हा एकदा स्थिर सुरुवात आणि मोठी भागीदारी करुन करण्याची जबाबदारी असणार आहे. मधल्या फळीतील फलंदाज हरलीन देओलकडूनही मोठी खेळी करण्याची अपेक्षा असेल. गोलंदाजी विभागात, गेल्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी संघात परतलेली रेणुका ठाकूरकडून लवकर विकेट्स घेण्याची अपेक्षा असेल.

डीवाय पाटीलची खेळपट्टी पारंपारिकपणे फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. पण दुसऱ्या डावात दव महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे, या सामन्यात नाणेफेक देखील महत्त्वाची असेल. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन आणि अनुभवी सुझी बेट्स भारतासाठी एक महत्त्वाचे आव्हान उभे करू शकतात. किवी संघाचे आधीच दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे ते पूर्ण षटकांच्या स्वरूपात खेळून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यास प्रयत्नशील असतील.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा