तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी वारंवार होऊ लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. गरम पेये जसे की चहा किंवा कॉफी पिताना तोंड भाजणे, दात घासताना जिभेवर चुकून लागणे या कारणांनी तोंडात जखमा होऊ शकतात. पण जर कोणतीही बाह्य दुखापत न होता तोंड वारंवार येत असेल, तर हे आरोग्याच्या इतर समस्यांचे संकेत असू शकते.


जाणून घ्या तोंड येण्यामागील कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय:


तोंड येण्यामागची प्रमुख कारणे


रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास संक्रमण होण्याची शक्यता वाढते. यामुळे तोंड येण्याचे प्रमाण वाढू शकते.


हार्मोन्समधील चढ-उतार
महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान हार्मोनल बदल होतात. त्यामुळे या काळात तोंड येण्याची समस्या जाणवते.


व्हिटॅमिन्सची कमतरता
व्हिटॅमिन B12, आयर्न आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे तोंडात वारंवार फोड येतात.


पचनतंत्रातील बिघाड
अपचन, बद्धकोष्ठता किंवा आंतड्यांचे विकार असलेल्या व्यक्तींमध्ये तोंड येण्याची समस्या अधिक दिसून येते.


संसर्ग आणि अ‍ॅलर्जी
दूषित पाणी पिणे, बॅक्टेरिया किंवा व्हायरल संसर्ग, तसेच काही अ‍ॅलर्जीक पदार्थ खाल्ल्यामुळेही तोंडात फोड येऊ शकतात.


धूम्रपान आणि तंबाखू सेवन
तंबाखूजन्य पदार्थांचा वापर तोंडाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. धूम्रपानामुळे तोंड येणे आणि कधीकधी अल्सर होण्याची शक्यता असते.


तोंड येण्यावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय


कोरफडीचा उपयोग
कोरफड (अ‍ॅलोवेरा) मध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. कोरफडीचा रस प्यायल्याने तोंडातले फोड लवकर बरे होतात.


लिकोरिस पावडर आणि मध
गुळवेल किंवा लिकोरिस पावडर मधात मिसळून घेणे तोंडाच्या अल्सरसाठी प्रभावी ठरते.


पुरेसे पाणी पिणे
शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्यामुळे तोंड येण्याचे प्रमाण कमी होते.


हळद पाण्याने गुळण्या
कोमट पाण्यात हळद टाकून गुळण्या केल्याने तोंडातील सूज आणि वेदना कमी होतात. हळदीचे अ‍ॅंटीसेप्टिक गुण फायदेशीर ठरतात.


तोंड येणे ही एक साधी वाटणारी पण त्रासदायक समस्या असू शकते. ही समस्या वारंवार होत असल्यास, ती केवळ घरगुती उपायांवर सोडवण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. योग्य आहार, पचनसंस्थेची काळजी आणि स्वच्छता पाळल्यास या समस्येपासून दूर राहता येईल.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे