Akola News : पाडव्याआधीच 'काळाचा घाला'! ऐन दिवाळीत भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार; अकोल्यात शोककळा

अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री एका भीषण अपघातामुळे सणाला गालबोट लागले. अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) पैलपाडा गावाजवळ ही अत्यंत दुःखद घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार जणांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये अश्विनी शिरसाट आणि धिरज शिरसाठ या पती-पत्नीचा समावेश आहे, तसेच आरिफ खान यांनाही आपला जीव गमवावा लागला. तर, अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरू आहेत. सणासुदीच्या दिवशीच तिघांवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे आणि मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.



बंद पडलेल्या कारजवळ अपघात: नेमकं काय घडलं?


अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगावमंजू येथील रहिवासी असलेले धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे जोडपे त्यांचे काम आटोपून त्यांच्या चारचाकी गाडीने (Four-wheeler) घरी परतत होते. रस्त्यात अचानक त्यांची कार बंद पडली. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी फोन केला आणि त्यांची बंद पडलेली कार एका मालवाहू गाडीने (Goods Vehicle) टोचन (Towing) करून नेली जात होती. पैलपाडा गावाजवळ पोहोचल्यानंतर, गाडीतून चौघे जण खाली उतरले. ते रस्त्याच्या बाजूला उभे राहून गाडीचे टायर्स (Tyres) तपासत होते. नेमक्या याच वेळी, अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात गाडीने त्यांना जोराची धडक दिली आणि त्यांना चिरडले. धडक इतकी जबर होती की, चौघेही गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. या अपघातात धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट या दांपत्यासह आरिफ खान (सर्व बोरगावमंजूचे रहिवासी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चौथा व्यक्ती अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर अपघाताप्रकरणी बोरगावमंजू पोलिस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

‘मजबुरी’चे दुसरे नाव ‘ठाकरे परिवार’ आणि बच्चू कडू म्हणजे ‘नौटंकी’

तुमची संपत्ती मला द्या, माजी खासदार नवनीत राणा यांचे खुले आव्हान अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहार

Pune Saras Baug : पुणेकरांच्या उत्साहाला गालबोट; सारस बागेत वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांची तातडीने मध्यस्थी

पुणे : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या धमक्यांमुळे यंदा चर्चेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग दिवाळी पाडवा

नागपुरात फटाक्यांचा 'धुमाकूळ'! रात्रभरात सहा ठिकाणी आगीच्या घटना; मोठे नुकसान

नागपूर: दिवाळीच्या दिवसांत नागपुरात फटाक्यांची आतषबाजी आणि निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीच्या घटनांनी मोठी

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली