दिवाळीच्या फोटोमधून पत्नी गायब; वीरेंद्र सेहवागच्या कुटुंबातील तणावाच्या चर्चांना पुन्हा उधाण

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्त त्याने आपल्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या, मात्र त्या फोटोत त्याची पत्नी आरती न दिसल्याने अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.


सेहवागच्या घरी साजऱ्या झालेल्या दिवाळी सेलिब्रेशनचे हे फोटो असून, त्यात तो आपल्या आई आणि दोन मुलांसोबत – आर्यवीर आणि वेदांत – दिसतो. मात्र पत्नी आरती कुठेही नसल्याने, दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना नवे फोड मिळाले आहे.


या फोटोसह सेहवागने एक संस्कृत श्लोक लिहून शुभेच्छा दिल्या –
“दीपज्योतिः परं ब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥”
#HappyDeepavali


हा फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि युजर्सनी कमेंटमध्ये अनेक प्रश्न विचारले. “तुमची पत्नी कुठे आहे?”, “घटस्फोट झाला का?” अशा थेट विचारलेल्या प्रश्नांनी कमेंट सेक्शन भरून गेला. काहींनी तर, “पत्नीशिवाय सण कसा साजरा करता?” असे म्हणत नाराजी व्यक्त केली.


मागील काही महिन्यांपासून सेहवाग आणि आरती यांच्या वैवाहिक नात्याबाबत चर्चा सुरू आहेत. काही अफवांनुसार दोघांमध्ये वाद सुरू असून, आरतीचा सेहवागच्या जवळच्या मित्राशी संबंध असल्याचीही चर्चा झाली होती. मात्र या सगळ्यावर सेहवाग किंवा आरती यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


सेहवाग आणि आरती यांची ओळख कौटुंबिक नात्यातून झाली होती. दोघं लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. २००४ मध्ये त्यांनी लग्न केलं. हे लग्न नवी दिल्लीतील दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी पार पडलं होतं. त्यांच्या दोन मुलांचा जन्म २००७ आणि २०१० मध्ये झाला.


दिवाळीच्या फोटोत आरतीच्या अनुपस्थितीमुळे, त्यांच्या नात्यात खरोखरच काहीतरी बिनसले आहे का, यावर चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. मात्र, जोपर्यंत या दोघांकडून अधिकृत खुलासा होत नाही, तोपर्यंत याबाबत खात्रीने काहीही म्हणता येणार नाही.

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील