अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातला दाखविले आसमान

ओमरझाईचे चार बळी, इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकी खेळीने मिळाला विजय


नवी दिल्ली : मुख्य गोलंदाज अझमतुल्ला ओमरझाईने चार षटकात अवघ्या १५ धावांमध्ये घेतलेले चार बळी व इब्राहिम झद्रान आणि सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या ४१ चेंडूतील ५३ धावांची अर्धशतकी खेळी व त्यास इतर फलंदाजांनी दिलेली साथ यामुळे अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातचा पाच विकेट राखून विजय मिळविला.


विजयासाठी १६१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज हा डावातील दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर इब्राहिम झद्रानने ४१ चेंडूत ५३ धावा करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. वनडाऊन खेळण्यासाठी आलेल्या गुलबदीन नायबने १२ चेंडूत १३ धावा करत दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांच्या भागिदारीत आपले योगदान दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सेदिकुल्ला अटलने १४ चेंडूत १६ धावा, दारविश रसूलने २३ चेंडूत ३३ धावा आणि अझमतुल्ला ओमरझाईने २१ चेंडूत नाबाद ४० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद नबी ३ धावांवर नाबाद राहिला. अमीरातीकडून जुनैद सिद्दीकीने २३ धावांत दोन बळी, मुहम्मद अरफानने ३० धावांत दोन बळी, मुहम्मद जवादुल्लाने ३९ धावांत एक बळी घेतला.


संयुक्त अरब अमीरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ९ बळी गमावत प्रति षटकामागे आठ धावांच्या सरासरीने १६० धावा केल्या. अवघ्या १३ धावांमध्ये संयुक्त अरब अमीरातचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्याने शंभरच्या आत डाव संपणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. संघाचा यष्टीरक्षक असलेला सलामीवीर आर्यांश शर्मा हा शून्यावर तर दुसरा सलामीवीर कर्णधार मुहम्मद वसीम हादेखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अलिशान शराफू आणि सोहेब खान यांनी ८४ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अलिशान शराफूने ३१ चेंडूमध्ये ४० धावा तर सोहेब खानने ४८ चेंडूमध्ये ६८ धावा करत संघाची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमीरातची फलंदाजी गडगडली व ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. केवळ सय्यद हैदर (१३ धावा)आणि हैदर अलीच्या (१३ धावांचा) अपवाद वगळता अमीरातीच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. मुजीब उर रहमानने ३१ धावांत दोन बळी तर रशीद खानने २४ धावांत एक बळी घेत अमीरातीच्या धावसंख्येला लगाम घातला.

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा