टी-२० मध्ये रशीद खानचा ७०० बळींचा वर्ल्ड रेकॉर्ड!

ऐतिहासिक पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज


मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी पहिला सामना अफगाणिस्तान व युएई यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान पहिल्या डावात खेळत असताना संघाचा कर्णधार रशीद खानने एक विकेट घेताच टी-२० इतिहासात विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.


रशीद खानच्या गोलंदाजीवर युएईचा फलंदाज मुहम्मद अरफान हिट विकेट होत बाद झाला. रशीदच्या फिरकीविरूद्ध खेळताना त्याचा तोल गेला आणि थेट विकेटवर बॅट मारली. या सामन्यातील रशीदची ही पहिली विकेट होती. यासह रशीदने टी-२० क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा मोठा टप्पा गाठला.


रशीद खान हा टी-२० इतिहासात ७०० विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आणि हा अनोखा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला. रशीद टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय जगभरात विविध टी-२० लीग खेळतो. जिथे त्याने आपल्या फिरकीने मैदान गाजवलं आहे आणि यासह त्याने ७०० विकेट्सचा टप्पा गाठला. रशीद खानने ५१२ टी-२० डावांमध्ये ६.५९च्या इकॉनॉमीने व १८.५०च्या उत्कृष्ट सरासरीसह ७०० विकेट्स पूर्ण केल्या. यादरम्यान त्याची उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी ही १७ धावा देत ६ विकेट्स अशी आहे.


रशीद खानच्या आधी ड्वेन ब्रावोच्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम होता, जो रशीदने फार पूर्वीच आपल्या नावे करत त्याला मागे टाकलं होतं. रशीद खान आता फक्त २७ वर्षांचा असून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा मोठा आकडा रशीद गाठू शकतो, यात शंकाच नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही रशीद खानच्या ७००० विकेट्स पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केली आहे.


टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज


रशीद खान – ७०० विकेट्स
ड्वेन ब्रावो – ६३१ विकेट्स
सुनील नरेन – ६१३ विकेट्स
इमरान ताहिर – ५७२ विकेट्स
आंद्रे रसेल – ५०८ विकेट्स

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा