मोहित सोमण:आदल्या दिवशीची शेअर बाजारातील रॅली मुहुरत ट्रेडिंग (समावत २०८२) दरम्यान अबाधित ठेवली आहे. अर्थात शेअर बाजारातील मजबूत फंडामेंटल आधारे शेअर बाजारातील वृद्धी जाणवली असली तरी भविष्यात संभाव्य टेक्निकल धोके लक्षात घेतल्यानंतर काही निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात गुंतवणूकदारांनी सावध प्रतिसाद दिला. परिणामी शेअर बाजारातील सेन्सेक्स ६ २.९७ अंकाने उसळत ८४४२६.३४ पातळीवर स्थिरावला आहे. तर निफ्टी २५.४५ अंकांनी उसळत २५८६८.६० पातळीवर स्थिरावला आहे. विशेषत उल्लेख करायचा झाल्यास दोन्ही बँक निर्देशां कात मुहुरत ट्रेडिंग असूनही घसरण झाली आहे. साधारणतः विशेष दिवाळी ट्रेडिंग सत्रात गेल्या १० वर्षातील आकडेवारी पाहिल्यास पहिल्यांदा बँक निफ्टी घसरण झाली आहे.
व्यापक निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात व्यापक बाजारात संमिश्र वातावरण दिसून आले आहे. निफ्टी मिडकॅप ५० मध्ये ०.१२% घसरण झाली असून निफ्टी स्मॉलकॅप १०० आणि निफ्टी मायक्रोकॅप २५ ० मध्ये अनुक्रमे ०.४३% आणि ०.९८% वाढ झाली. त्यामुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांना ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपपेक्षा लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी गुंतवणूकदारांची इच्छा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या श्रेणीतील तिमाही निकालासह या कंपन्यांच्या वाढीवर बाजाराचे लक्ष केंद्रित होऊ शकते. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात विशेष सत्रात सर्वाधिक वाढ मिडि या (०.५६%), मेटल (०.४०%), फार्मा (०.३४%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.३८%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मिडमॉल फायनांशियल सर्विसेस (०.११%), रिअल्टी (०.०९%) निर्दे शांकात झाली आहे. विशेषतः अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील नव्या वर्षाची सुरुवात नव्या वाढीने झाल्याने सकारात्मक संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते पुढील मुहुरत ट्रेडिंगपर्यंत बा जार ३०००० पार करू शकतो. मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढीचे संकेत जीएसटी कपातीमुळे मिळतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तत्पूर्वी सुरक्षित परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदा रांची भूमिकाही शेअर बाजारात आगामी वर्षासाठी कारणीभूत ठरले.
युएस शेअर बाजारातील सुरूवातीच्या कलात मंगळवारी शेअर बाजारातील फ्युचर्समध्ये तुलनेने बदल झाला नाही जागतिक तज्ञांच्या मते, आदल्या दिवशीही युएस गुंतवणूकदारांनी अनेक आर्थि क निकालाला प्रतिसाद दिलेला आहे.मागील सत्रातील तेजीनंतर त्यांनी निश्चिंतता व्यक्त केली आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरीशी जोडलेले फ्युचर्स सपाट पातळीच्या आसपास सुरुवातीच्या कलात आहेत.एस अँड पी ५०० फ्युचर्स आणि नॅस्डॅक-१०० फ्युचर्स देखील फ्लॅट होते. अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल मिळाल्याने युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात किरकोळ वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.१८%) वगळता इतर निर्देशांकात वाढ झाली आहे. चीनच्या मजबूत आकडेवारीचा फायदा बाजाराला होताना दिसत आहे. मोठ्या शेअर्सपैकी आज इन्फोसिस, अँक्सिस बँक, होंडाई मोटर्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, टाटा स्टील समभागात वाढ झाली आहे. तर लार्जकॅप शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, एमआरएफ शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
आजच्या विशेष सत्रात सर्वाधिक वाढ टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (८.७०%), एथर एनर्जी (६.०४%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (५.६८%), ज्युबिलंट फार्मा (५.३२%), एसबीएफसी फायनान्स (४ .१८%), नुवामा वेल्थ (३.४३%), स्विगी (२.४२%) समभागात झाली आहे. विशेष सत्रात सर्वाधिक घसरण जेएम फायनांशियल सर्विसेस (१.५२%), मुथुट फायनान्स (१.४३%), न्यूलँड लॅब्स (१.०७% ),सेंच्युरी फ्लायबोर्ड (१.०७%), एस आर एफ (१%),टीबीओ टेक (०.८१%), कोटक महिंद्रा बँक (०.७६%), एमआरपीएल (०.७२%) समभागात झाली आहे.