जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान

उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी


मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.


यानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल. यात खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, माल्स, रिटेलर्स आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.


अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.


सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये रायगड (पंचायत समित्या - पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड. रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर); रत्नागिरी (मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर); सिंधुदुर्ग (वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग); पुणे (जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर); सातारा (खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड); सांगली (आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज); सोलापूर (करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट); कोल्हापूर (शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड); छत्रपती संभाजीनगर (सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण); परभणी (जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड); धाराशीव (परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा) आणि लातूर (पंचायत समित्या - अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित