Raj Thackeray: राज ठाकरेंसमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला 'उबाठा'बाबत तक्रारींचा पाढा

- मुंबई पालिका निवडणुकीत मनसेच्या वॉर्डात 'उबाठा'ची मते फिरली?


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसेच्या अंतर्गत असंतोषाला उघडपणे वाट मोकळी करून देणारी महत्त्वाची बैठक सोमवारी (२ फेब्रुवारी) वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीत पराभूत उमेदवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ‘उबाठा’ गटाबाबतच्या तक्रारी मांडत, अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप केला.


बैठकीत उपस्थित उमेदवारांनी सांगितले की, मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये उबाठा गटाची मते मनसेकडे वळली नाहीत. निवडणुकीदरम्यान उबाठा गटाने प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग न घेतल्यामुळे मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा दावा करण्यात आला. अनेक मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून, थोड्या फरकाने विजय हुकल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे यांनी उमेदवारांनाच सवाल करत, युती असली तरी स्थानिक पातळीवर तुमची स्वतःची तयारी किती होती, असा थेट प्रश्न उपस्थित केला. केवळ युतीवर अवलंबून राहून निवडणूक जिंकता येत नाही, असेही ते म्हणाल्याचे समजते.


बैठकीत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आपली भूमिका मांडली. जागावाटपाच्या वेळी मनसेला ताकदीचे वॉर्ड मिळाले नसल्याचा परिणाम निकालांवर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या वॉर्डांमध्ये मनसेची पकड भक्कम होती, त्या वॉर्डांऐवजी तुलनेने कमजोर मतदारसंघ देण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


माध्यमांशी बोलणे टाळले


बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार नाही, एवढे स्पष्ट करत ते निघून गेले. तर, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही बैठक पूर्णतः अंतर्गत असल्याचे सांगितले. बैठकीतील चर्चेचा तपशील कॅमेऱ्यासमोर सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी उबाठा गटाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले.

Comments
Add Comment

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून