परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत. दिवसा प्रखर उष्णता आणि संध्याकाळी अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः चिंतेत सापडला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेण्याची भीती निर्माण झाली आहे.

भाताच्या लोंब्यांत दाणा तयार झाला असून, काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे कापणी केलेले धान भिजून चिखलात बसले आहे. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. काही ठिकाणी शेतातील पिके पूर्णपणे झोपली आहेत, तर कोठे कोठे ठेवलेले भाताचे भारे पुन्हा ओले झाले आहेत.

भात कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संकट आणखी वाढले आहे. परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. दिवाळीचा आनंद साजरा करण्याऐवजी बळीराजा पावसाच्या विश्रांतीची वाट पाहत शेतातच धावपळ करताना दिसतो आहे.

या वर्षी ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी धैर्याने खरिप हंगामासाठी पुन्हा पेरणी केली होती. मात्र आता परतीच्या पावसाने उरलेसुरले पीकही उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगड आणि परिसरात सध्या “पावसात भिजलेले शेत, चिंतेत बुडालेले शेतकरी” असे वास्तव दिसत आहे. बळीराजाची दिवाळी पुन्हा एकदा शेतातच अडकली असून, प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान