Navi Mumbai : कामोठे येथे सिलिंडर स्फोटानंतर घरात आग; दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच दोघांचा जीव गेला होता.


कामोठे, सेक्टर 36 मधील आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आणि तिचा भडका उडाला. आगीमुळे घरात अडकलेल्या आई आणि मुलीला  बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.


आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग विझवल्यानंतर तपासणी केली असता घरात अडकलेल्या आई आणि मुलीचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा