Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट उभे राहिले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामान खात्याने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा (Flood Situation) मोठा फटका बसला होता. या काळात मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली, अनेक घरे पाण्याखाली गेली आणि मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. या नुकसानीतून नागरिक आणि विशेषतः शेतकरी जेमतेम सावरत असतानाच, पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्यांच्या चिंतेत आणि त्रासात भर पडली आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. यामुळे आज, म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवसांसाठी राज्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आजपासून (२१ ऑक्टोबर) राज्यातील विविध भागांसाठी मुसळधार पावसाचे अलर्ट जारी केले आहेत. प्रामुख्याने कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



कुठे कुठे आहेत इशारे?




२१ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.


२२ ऑक्टोबर, कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा.


२३ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.


२४ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर (अहमदनगर), सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.


२५ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर (अहमदनगर). मराठवाडा/विदर्भ: संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भ (या भागातील सर्व जिल्ह्यांसाठी).


Comments
Add Comment

लोणावळ्यात महिलेचा फळविक्रेती ते नगरसेविकापर्यंतचा प्रवास

लोणावळा : लोणावळ्यातील फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना नगरसेविका

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर मलकापूरजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या

मराठवाड्यात मविआला मोठा धक्का; परभणी-धाराशिवमध्ये महायुतीचा डंका

धाराशिव : राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव या दोन

Maharashtra Local Body Elections : "विरोधकांचे 'नरेटिव्ह' भुईसपाट..."; भाजपच्या ऐतिहासिक यशावर मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर सणसणीत टोलेबाजी!

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राचे राजकीय चित्र पुन्हा एकदा

मंचरमध्ये पडली समान मत; ईश्वर चिठ्ठीने निवडला नगरसेवक

मंचर : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मिनी विधानसभा म्हणून

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List : कोकण ते विदर्भ अन् पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा; संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचाच डंका, विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीने विजयाची