सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच पनवेल महानगरपालिका मुख्यालयातील जनरेटरला लागलेली आग ताजी असतानाच, रविवारी पहाटे कामोठे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा वसाहतीतील तिसऱ्या मजल्यावर आग लागून शिरोडिया कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

या आगीत रेखा शिसोडिया (आई) आणि पायल शिसोडिया (मुलगी) हे दोघे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात तीन गॅस सिलिंडर असल्याने आगीचा भडका उडाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच कळंबोली, पनवेल आणि न्यू पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दलाच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, दुसरी घटना वाशी सेक्टर १४ येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये घडली. रात्री दीडच्या सुमारास १९व्या मजल्यावर आग लागून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या सलग लागलेल्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांत महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेषत: उंच इमारतींमधील फायर सेफ्टी सिस्टीम कार्यरत आहे का, गृहसंस्थांनी सेफ्टी ऑडिट केले आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता महापालिका प्रशासन यावर कारवाई करते की बघ्याची भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व