काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील काशिमीरा परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेला हा वाद आज पुन्हा उफाळला आणि त्याचे रूप गंभीर झाले. या राड्यात तब्बल २५ रिक्षांची तोडफोड करण्यात आली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


घटनेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची चौकशी केली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि माध्यमांशी संवाद साधताना काही गंभीर आरोप केले.


सरनाईक म्हणाले, “माशाचा पाडा परिसरात काही गुंडांनी आमच्या आया-बहिणींची छेड काढली. इतकेच नाही, तर एका लहान मुलीचीही छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला मी स्वतः पोलीस ठाण्यात पाठवले असून, गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “या परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढत असताना गुंडगिरीही प्रचंड वाढली आहे.”


याचबरोबर सरनाईक यांनी या भागात अंमली पदार्थ विक्री आणि बाहेरून आलेल्या संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर बोट ठेवले. “गांजा-चरस सारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी एक किलो गांजा जप्त केला होता. तरीदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं येथे मोठ्या प्रमाणात येत आहेत. माझ्या अंदाजानुसार काही बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोर या परिसरात राहात असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.


सरनाईक यांनी पुढे सांगितले की, “मी पोलिसांना सखोल चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिकांनी येथे पोलीस चौकीची मागणी केली असून ती लवकरच उभारण्यात येईल. परिसरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई केली जाईल.”


या घटनेनंतर काशिमीरा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिवाळीच्या उत्साहात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

Kia India November Sales: नोव्हेंबरमध्ये किया इंडियाची विक्रीत २४% विक्रमी वाढ

मोहित सोमण: किया इंडिया या देशातील मास स्केल मिड प्रिमियम कारमेकरने भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्‍यापासून

Meesho IPO Day 1 Update: मिशोला पहिल्या दिवशी १.२२ पटीने सबस्क्रिप्शन 'ही' आहे माहिती

मोहित सोमण: मिशो या बहुप्रतिक्षित आयपीओला पहिल्या दिवशी १.२२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण पब्लिक इशूपैकी

Devendra Fadanvis : 'राजकीय पर्यावरणवाद्यां'कडून कुंभमेळ्याच्या आयोजनात खोडा घालण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप!

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता भव्यदिव्य आयोजन करणार मुंबई : “नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

Aequs IPO Day 1: Aequs आयपीओचा 'जलवा' पहिल्या दिवशी काही तासांत संपूर्ण आयपीओ सबस्क्राईब

मोहित सोमण: ९२१ कोटींच्या एईक्वियस लिमिटेड (Aequs Limited IPO) आयपीओसाठी आज सुरूवात झाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या

Goregoan Traffic : वाहतूक कोंडीत अडकून रुग्णाने रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का?

गोरेगावमधील भाजपाच्या माजी नगरसेविकेचा प्रशासनाला संतप्त सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव पूर्व येथील आरे