मोहित सोमण:आज दिवाळीच्या पवित्र सणाला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स ४११.१८ अंकांने उसळत ८४३६३.३७ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी १३३.३० अं काने उसळत २५८४३.१५ पातळीवर स्थिरावला आहे. आज दुपारच्या मध्य सत्रात भूराजकीय स्थितीचा कुठलाही प्रभाव न पडता देशांतर्गत व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवल्याने आज शेअर बाजार मजबूतीने बंद झाला आहे. विशेष तः सेन्सेक्स बँक व बँक निफ्टी निर्देशांकाने मोठी रॅली नोंदवल्याने बाजाराला आधारभूत पातळी गाठता आली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (२.८७%), आयटी (०.९८%), हेल्थकेअर (०.९१%), तेल व गॅस (१.४२%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (२.०३%) निर्देशांकात झालेल्या वाढीचा फायदा बाजाराला झाला. दुसरीकडे व्यापक निर्देशांकातही निफ्टी १०० (०.४६%), निफ्टी २०० (०.५१%), मिड कॅप १०० (०.७५%) वाढ झाली आहे. मात्र ऑटो (०.१६%), एफएमसीजी (०.०३%), मेटल (०.०७%) समभागात झालेल्या घसरणीमुळे रॅली मर्यादित स्वरूपात रोखली गेली.
आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१९%), एस अँड पी ५०० (०.५३%), नासडाक (०.५९%) निर्देशांकात वाढ झाली असून आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सगळ्याच निर्देशांकात वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक वाढ जकार्ता कंपोझिट (२.१४%), निकेयी २२५ (३.००%), हेंगसेंग (२.४१%), तैवान वेटेड (१.४०%) निर्देशांकात वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ सीईएटी (१२.६३%), एयु स्मॉल फायनान्स बँक (९.१८%), एमआरपीएल (७.५७%), जेके टायर्स (७.२३ %), फेडरल बँक (६.९२%), करूर वैश्य बँक (६.१२%) समभागात झाली आहे. अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (९.४५%), तेजस नेटवर्क (८.४८%), युटीआय एएमसी (४.४१%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.७४%), जेएसडब्लू एनर्जी (२.८८%), पुनावाला फायनान्स (२.७८%) समभागात झाली आहे.