दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील जवान देशाचे रक्षण करत असतो. त्यांची दिवाळी म्हणजे आपल्या सीमेचे रक्षण करणे हेच होय. त्यामुळे भारतीय जवानांनासुद्धा सीमेचे रक्षण करताना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा यासाठी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी फराळ पाठवण्यात आला आहे.


भारत विकास परिषदेने यावर्षी पनवेलमधून ६० हजार लाडू, ६० हजार चकल्या, १ हजार ८७५ किलो शेव, चिवडा आणि शंकरपाळे असा एकूण १३ हजार ५० किलोचा फराळ भारतीय जवानांना पाठवला आहे. भारत विकास परिषदेच्या या उपक्रमात अनेक नागरिकांचा सहभाग असतो. ज्यामुळे एवढा फरळ तयार करणे शक्य होते. यावर्षी या उपक्रमाचे सहावे वर्ष आहे.​​लेह, सियाचीन, तवांग, अरुणाचल प्रदेश, गुवाहाटी, जम्मू-कश्मीर, पुंछ, राजस्थान, बारमेर आणि जैसलमेर प्रदेशातील सीमाभागात फराळ पोहचेल याची व्यवस्था केली गेली आहे.




यंदाही दिवाळीपूर्वीच पनवेलकरांचा फराळ भारताच्या सीमेवर पोहचविण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून केला आहे. सैनिकांना दिवाळीत फराळ मिळावा, हा उद्देश ठेवून जुलैपासून तयारी सुरू करण्यात आली होती. हा फराळ प्रत्येक सैनिकासाठी स्वतंत्र बॉक्स मध्ये पॅक करण्यात आला. ज्यात एका बॉक्समध्ये ४ लाडू, चकली, शेव, शंकरपाळी, चिवडा असा ९०० ग्रॅम वजनाचा फरळा भरण्यात आला आहे. असे पंधरा हजार बॉक्स तयार करण्यात आले.


लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी यावर्षी तब्बल ४० लाखांचा खर्च झाला. अनेक तरुणांनी या उपक्रमात भाग घेतला. तसेच प्रत्यक्ष आर्थिक मदत करू न शकणाऱ्या व्यक्तींनी फराळाचे बॉक्स पॅकिंग करून श्रमदान केले. फराळाच्या बॉक्ससोबतच शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेली शुभेच्छापत्रेही पाठवण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी