पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन आणि पाडवा या दिवाळीतील शुभमुहूर्तांदरम्यान एकूण १३ हजार ३८७ वाहनांची नोंदणी झाली. यात ८ हजार ७६३ दुचाकी आणि २ हजार ७६८ चार चाकींचा समावेश आहे. व अन्य इतर वाहने, गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहनखरेदीत किंचित वाढ झाली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ पुणे येथे ८ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ही नोंद झाली. गेल्या वर्षी (दि. १९ ते २८ ऑक्टोबर ) एकूण १२ हजार २३५ वाहनांची खरेदी झाली होती. त्यामुळे यंदा पुण्यातली वाहन खरेदी ही १ हजार १५२ वर गेली आहे. नवीन वाहन खरेदीचा आनंद घेताना पुणेकरांनी आपली नवी वाहने सजवून त्यांची मुहूर्तावर विधिवत पूजा करून घरी नेली यामुळे वाहनांच्या शोरूम बाहेर पुणेकरांची गर्दी पाहायला मिळाली. शोरूम बाहेर लगबग आणि फोटोंसाठी उभे असलेले ग्राहक असे चित्र काल पुण्यातील बऱ्याच शो रूम बाहेर बघायला मिळाले. शुभ मुहूर्तावर पुणेकरांन वाहन घरी घेऊन जात यावे म्हणून आरटीओ कर्मचाऱ्यांकडून मेहनत घेतली गेली. वाहनविक्रेत्यांकडून आलेल्या नोंदणी अर्जाचे तत्परतेने परीक्षण करून नोंदी वेळेत पूर्ण करण्यात येत असल्याचे आरटीओ कडून सांगण्यात आले.