मुलुंड पश्चिम येथील पक्षीगृह बांधण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळेना...

मुंबई (खास प्रतिनिधी) : नाहूर, मुलुंड पश्चिम येथे मुंबई महापालिकेच्या वतीने पक्षीगृह उभारण्यात येणार असून या पक्षीगृहाच्या उभारणीसाठी कंत्राटदार निवडीकरता निविदा मागवण्यात आली आहे. मात्र या निविदेला प्रतिसाद न लाभल्याने आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.


नाहूर, मुलुंड (पश्चिम) येथे मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या सुमारे १७१३९.६४ चौरस मीटर क्षेत्रफळांपैकी सुमारे १०,८५९ चौरस मीटर क्षेत्रफळावर पक्षीगृह बांधण्यात येणार आहे. त्याबाबत महाटेंडर पोर्टलवर १७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राप्त होतील, अशा रितीने निविदा मागविण्यात आली होती. या निविदेस अल्प प्रतिसाद प्राप्त झाल्यामुळे निविदा सादर करण्याची कालमर्यादा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसार वाढविण्यात आली आहे.


पक्षीगृह समवेत तिकीट घर, स्वच्छतागृह, भूमिगत वाहनतळ इत्यादी सुविधा या प्रकल्पात प्रस्तावित आहेत. या सुविधेमुळे पक्षी तथा प्राणी आणि पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढेल तसेच महानगरपालिकेच्या महसुलातही भर पडेल. या पक्षीगृहाचे बांधकाम वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील बांधण्यात आलेल्या पक्षीगृहासारखे असेल आणि त्यामुळे पर्यटकांना मुलुंड पक्षीगृहाच्या स्वरुपामध्ये आणखी एक पर्याय उपलब्ध होइल. भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयास भेट देण्यासाठी प्रवासाचे अंतर लक्षात घेता, मुंबईसह उपनगरीय भागात राहणारे नागरिक या पक्षीगृहाला भेट द्यायला नक्कीच प्राधान्य देतील, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. मुलुंड भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांचा यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू असून त्यांच्या मागणीनुसारच निविदा प्रक्रिया पर्यंत याचे काम पोहोचले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Metro Good News : मुंबईकरांना मोठा दिलासा! अंधेरी-घाटकोपर मार्गावर १० ऑगस्टपासून 'मिक्स्ड-लूप' सेवा; गर्दीच्या वेळी ३ मिनिटांत मेट्रो!

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो १) (Andheri to Ghatkopar Metro 1) मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल