२०२६ ची होळी सनी देओलसाठी ठरणार का महत्त्वाची ? आगामी चित्रपटाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत माहिती दिली आहे. सनी देओल सध्या त्याचा ६८वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याने त्याच्या आगामी 'गबरू' चित्रपटाबद्दल पोस्ट करत हा चित्रपट १३ मार्च, २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.


सनी देओलने त्याच्या सोशल मीडिया खात्यावर एक मोशन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने कॅप्शन लिहिले आहे, 'Power isn't what you show, its what you do!, तुम्ही ज्याची वाट पाहत होतात ते येत आहे.' त्याच्या या कॅप्शनमुळे सनी पुन्हा बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु आहे.



गबरूपूर्वी सनी देओल 'बोर्डर २' या चित्रपटात तो दिसणार आहे. 'बोर्डर २' चित्रपट २२ जानेवारी, २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'गबरू' हा चित्रपट ऐन होळीच्या कालावधीत प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षक सुट्ट्यांमध्ये चित्रपट पाहायला जातील, असा अंदाज लावण्यात येत आहे. त्यामुळे २०२६ ची दिवाळी सनी देओलसाठी महत्त्वाची ठरणार आहे. गबरू हा चित्रपट सशांक उदापूरकर यांनी दिग्दर्शित केला आहे.

Comments
Add Comment

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या

वर्षा उसगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा

धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील

भाईजानचे साठीत पदार्पण! वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक खास रोषणाई

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने साठीमध्ये पदार्पण केले आहे. सलमान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेद हल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या