
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत माहिती दिली आहे. सनी देओल सध्या त्याचा ६८वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याने त्याच्या आगामी 'गबरू' चित्रपटाबद्दल पोस्ट करत हा चित्रपट १३ मार्च, २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.
सनी देओलने त्याच्या सोशल मीडिया खात्यावर एक मोशन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने कॅप्शन लिहिले आहे, 'Power isn't what you show, its what you do!, तुम्ही ज्याची वाट पाहत होतात ते येत आहे.' त्याच्या या कॅप्शनमुळे सनी पुन्हा बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या आजूबाजूला कडक सुरक्षा असते. सध्या सलमान ...