मोहित सोमण:देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचडीएफसी बँकेने आपला आर्थिक निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर १०.८% वाढ झाल्याने निव्वळ नफा १८६४१.३० कोटीवर पोहोचला होता. तज्ञांच्या १६७१४ कोटींच्या भाकीताला मागे सारून बँकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. आज संचालक मंडळाची (Board of Directors) बैठक होणार आहे. या निकालावर संचालक मंडळ अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे.गेल्या ति माहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात समाधानकारक वाढ झाली असली तरी अपेक्षित वाढ झाली नव्हती. मात्र या तिमाहीत बँकेने भरीव कामगिरी केली आहे. दुसऱ्या तिमाहीत बँकेने निव्वळ नफा १८६४१.२७ कोटी नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा नफा १६८ २०.९७ कोटी होता. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) ४.८% वाढत ३१५५१.५ कोटींवर पोहोचले आहे. प्री प्रोव्हिजनल ऑपरेटिंग नफ्यात (PROP) इयर ऑन इयर बेसिसवर १८.५% वाढ नोंदविण्यात आल्याचे बँकेने निकालात जाही र केले.
उपलब्ध माहितीनुसार, बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही वाढ झाली आहे. जीएनपीए (Gross Non Performing Assets GNPA) तब्बल ७.४% तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) घसरले असून निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NPA) ६.७५% घसरण तिमाही बेसिसवर झाल्याने एनपीए ११४४७.२९ कोटींवर पोहोचला. बँकेच्या माहितीनुसार, सीएसआर (Capital Adequacy Ratio CAR) इयर ऑन इयर बेसिसवर ३० सप्टेंबरपर्यंत २०.०% पातळीवर पोहोचला आहे. सप्टेंबर ३०, २०२४ मधील १९.८% पातळीपेक्षा तो किरकोळ वाढला आहे. नियामक तरतुदीनुसार तो ११.९% अ सावा लागतो.
बँकेच्या इतर उत्पन्नात (Other Income) मध्येही २५% वाढ बँकेने नोंदवली. इयर बेसिसवर ही वाढ १४३५० कोटींवर पोहोचली आहे. रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एचडीबी फायनांशियल सर्विसेस (HDB) आयपीओ सूचीबद्ध (Listed) झा ल्यामुळे त्यातून झालेला आर्थिक लाभ बँकेला झाला.