गुजरातच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

गांधीनगर  : गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार करण्यात आला. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. तत्पूर्वी, गुरुवारी मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे, या मंत्रिमंडळ विस्तारात हर्ष संघवी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी २५ आमदारांना पदाची शपथ दिली, ज्यामुळे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या २६ झाली आहे. गेल्या वर्षी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेले आमदार अर्जुन मोढवाडिया यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. विसनगरचे आमदार ऋषिकेश पटेल, प्रफुल्ल पानशेरिया, कुंवरजी बावलिया यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आले आहे. कनुभाई देसाई, पुरुषोत्तम सोळंकी, नरेश पटेल, अहमदाबादच्या माजी उपमहापौर दर्शना वाघेला, गुजरात भाजप एससी मोर्चाचे माजी प्रमुख प्रद्युम्न वाजा, मोरबीचे कांतीलाल अमृतिया आणि वडोदराच्या मनीषा वकील यांनाही मंत्रीपदे बहाल केली आली आहेत.


मिसेस रवींद्र जडेजा मंत्रिमंडळात : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी रिवाबा जडेजा राजपूत संघटना करणी सेनेच्या सदस्या होत्या. २०१८ मध्ये करणी सेनेने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत मोठे आंदोलन केले होते, तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्याच वर्षी त्यांना करणी सेनेच्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

Comments
Add Comment

ठाण्यात बिबट्यांची दहशत

येऊर, वारली पाड्यात दोन श्वानांवर हल्ला ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आदिवासी पाड्यांमध्ये

बंड शमले, अपक्ष वाढवणार ताप

ठाणे पालिका निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार मैदानात ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील

अर्ज माघारी, बिनविरोध निवडीचे नाट्य संपले

ठाण्यात ६४९ उमेदवार रिंगणात, ७ बिनविरोध ठाणे : अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, ऐनवेळी मिळालेले एबी फॉर्म,

मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीसाठी भाजपचे १३ उच्चशिक्षित युवा

डॉक्टर, यांचा समावेश भाईंदर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना संधी देण्याबाबत दिलेल्या

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने