मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या मते, यामुळे मुंबईच्या जलवाहतुकीत नवी क्रांती होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित बोटींची सविस्तर पाहणी केली.



मुंबईच्या जल वाहतुकीत नवी क्रांती:


मंत्री राणे म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. कॅन्डेलाच्या पर्यावरणपूरक बोटींमुळे नागरिकांना जलवाहतुकीचा नवीन अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल. याशिवाय, या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूक, किनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.



बोट नेमकी कशी आहे?


बोटींच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलताना, मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी 8 आणि पी 12 या बोटांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात. त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी 12 बोट मुंबईत दाखल होणार असून, राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.


कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी मंत्री नितेश राणे यांना कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना, उत्पादन प्रक्रिया आणि भविष्यात महाराष्ट्रात उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत प्राथमिक माहिती दिली.


या उपक्रमामुळे मुंबईत जलवाहतुकीला गती मिळेल, किनारपट्टीच्या क्षेत्रात विकास होईल आणि नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाची संधी उपलब्ध होईल. जलवाहतुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या स्मार्ट सिटी दृष्टीकोनाला नवीन दिशा मिळेल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;

विधिमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय

आता महिनाभरात होणार जमीन मोजणी - राज्यात २०० 'खासगी भूमापकांची' नियुक्ती; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल

आखाती देशांमध्ये अडकलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेबाबत विधानपरिषदेत चर्चा

महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण

प्रवेशमार्गांवर घडणार मुंबईची ओळख

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक  संकल्पनांवर आधारित असेल प्रवेशद्वार महापौरांनी तिन्ही प्रवेशमार्गांची केली