पंतप्रधान मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त एसटीचा आगळावेगळा उपक्रम!

राज्यातील ७५ प्रमुख बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा' (वाचनालय) उभारणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा


मुंबई: भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) एक आगळावेगळा, लोकोपयोगी आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील ७५ प्रमुख एसटी बसस्थानकांवर प्रवाशांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी मोफत "वाचन कट्टा" (वाचनालय) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३०९ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या महत्त्वाकांक्षी निर्णयाची घोषणा केली.



श्रीकांत शिंदे आणि विनय सहस्रबुद्धे यांची संकल्पना


मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला आहे. मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘मोफत खुले वाचनालय’ उभारले जाणार आहे, ज्यामुळे ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा दिवा जनतेसाठी प्रज्वलित होईल.


या 'वाचन कट्ट्यांमध्ये' वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, व.पु. काळे, विश्वास पाटील अशा नामवंत साहित्यिकांच्या गाजलेल्या कृती उपलब्ध असतील. यासोबतच एमपीएससी (MPSC) व यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथ देखील ठेवण्यात येणार आहेत.


"हा ‘वाचन कट्टा’ मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणारा ठरेल आणि समाजात वाचन संस्कृतीचा नवा सुवर्णप्रकाश पसरेल," असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.


“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरी निमित्त आम्ही जनतेसाठी ज्ञानाची ही ‘अनमोल भेट’ देत आहोत. वाचन संस्कृती आणि मराठी साहित्याचा प्रचार हा आमचा लोकाभिमुख उपक्रम आहे.” — प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

Comments
Add Comment

ईस्टर्न फ्रीवेसाठी मुंबईतील ३२० झाडे तोडणार!

मुंबई : घाटकोपर आणि ठाणे दरम्यानच्या ईस्टर्न फ्रीवे (महामार्ग) विस्ताराच्या कामाला मुंबई महापालिकेच्या (BMC)

दिवाळीच्या फटाक्यांमुळे तब्येतीला धोका!

मुंबई : दिवाळीमध्ये फटाक्यांची रोषणाई खूप छान दिसते, पण त्यामुळे हवेचे प्रदूषण खूप वाढले आहे. त्यामुळे

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

मुंबई : कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक

अभिनेता जॅकी श्रॉफ 'थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र' अभियानाचे सदिच्छादूत!

मुंबई: ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट

“जनतेशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व हरपले” फडणवीसांकडून एक्सवर कर्डीले यांना श्रद्धांजली

मुंबई : राहुरीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजराने निधन झाले. यांच्या आकस्मिक

वेध निवडणुकीचा : उत्तर मुंबईत भाजपाचे मिशन ३२

मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मुंबई हा भाजपाचा गड मानला जात असला तरी मागील आगामी महापालिका निवडणुकीच्या