भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका (ODI Series) १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांना पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार (Test Captain) आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने एक खास निवड केली आहे. कमिन्सने भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या महान खेळाडूंना एकत्र करून आपली 'ऑल-टाईम वनडे प्लेइंग इलेव्हन' (All-Time ODI Playing XI) निवडली आहे. त्याच्या या निवडीमुळे क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सचिन तेंडुलकर आणि डेविड वॉर्नर सलामीला तर...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेचा थरार सुरू होण्याआधी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने निवडलेल्या 'ऑल-टाईम वनडे इलेव्हन' मध्ये काही अनपेक्षित खेळाडूंना स्थान मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. कमिन्सने सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आणि क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची निवड केली आहे. सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे, तिसऱ्या क्रमांकासाठी कमिन्सने विराट कोहली याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग याला पसंती दिली आहे. चौथ्या स्थानावर त्याने आधुनिक क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाज स्टीव्ह स्मिथ याची निवड केली आहे. या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून शेन वॉटसनचा (Shane Watson) समावेश करण्यात आला आहे, तर सहाव्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलियाचा फिनिशर मानला जाणारा मायकेल बेव्हन (Michael Bevan) याला स्थान देण्यात आले आहे.
पॅट कमिन्सच्या ऑल-टाईम संघात धोनी 'विकेटकीपर'
कमिन्सने विकेटकीपर म्हणून भारताचा महान कर्णधार आणि फिनिशर महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला पसंती दिली आहे. वेगवान गोलंदाजांच्या (Fast Bowlers) यादीत त्याने ऑस्ट्रेलियाचा स्फोटक गोलंदाज ब्रेट ली, भारताचा स्विंग स्पेशालिस्ट झहीर खान आणि ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्रा यांचा समावेश केला आहे. फिरकी गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाचा जादूगार शेन वॉर्न याला या संघात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही 'ऑल-टाईम इलेव्हन' निवडणारा पॅट कमिन्स स्वतः सध्या भारताविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेचा भाग नाही. त्याच्या अनुपस्थितीत, ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद अनुभवी वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क सांभाळणार आहे.
पुढील काही महिन्यांत 'वंदे भारत ४.०' धावणार! नवी दिल्ली : प्रवाशांसाठी रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली ...
वनडेचा 'शतकवीर' विराट कोहली आणि रोहित शर्माला पॅट कमिन्सने संघातून वगळले
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपल्या 'ऑल-टाईम वनडे प्लेइंग इलेव्हन' मध्ये घेतलेल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आधुनिक क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांनाही कमिन्सने आपल्या संघातून वगळले आहे. वनडे क्रिकेटमधील त्यांची आकडेवारी पाहता, कमिन्सचा हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारा आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराटने आतापर्यंत १४,१८१ धावा केल्या आहेत आणि ५१ शतके झळकावली आहेत. तो वनडे इतिहासातील सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. रोहित शर्मानेही वनडेमध्ये ११,१६८ धावा करत ३२ शतके झळकावली आहेत. इतकी अविश्वसनीय कामगिरी असतानाही या दोन भारतीय दिग्गजांना संघात स्थान न मिळाल्याने, कमिन्सच्या निवडीवर सध्या क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
१८ ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटचा थरार पुन्हा अनुभवण्यास मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात दोन्ही संघ तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिका आणि त्यानंतर पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने निवडलेल्या 'ऑल-टाईम वनडे प्लेइंग इलेव्हन' मुळे क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कमिन्सचा संघ खालीलप्रमाणे आहे :
सलामीवीर: डेव्हिड वॉर्नर
सचिन तेंडुलकर फलंदाज: रिकी पॉन्टिंग
स्टीव्ह स्मिथ अष्टपैलू: शेन वॉटसन
मायकेल बेवन यष्टीरक्षक: एम एस धोनी
गोलंदाज: ब्रेट ली, शेन वॉर्न, झहीर खान, ग्लेन मॅकग्रा