मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना

मुंबई : भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


१७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव आणि मन्नारच्या आखाताच्या भागात ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची, तसेच काही ठिकाणी ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी झोत येण्याची शक्यता आहे. या काळात मच्छिमारांना समुद्री भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


२० आणि २१ ऑक्टोबर रोजी या वादळी स्थितीचा प्रभाव आणखी काही भागांपर्यंत वाढण्याची शक्यता असून, पूर्व आणि मध्य अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये ताशी ३५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, लक्षद्वीप, मालदीव आणि आग्नेय अरबी समुद्र परिसरात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असून, समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनी खबरदारी घ्यावी आणि शक्यतो समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आयएनसीओआयएस यांनीही उंच लाटांचा विशेष इशारा जारी दिला आहे.


राज्य शासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व मच्छिमार बांधवांना आवाहन केले आहे की, हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पुढील आदेश मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याची दक्षता घ्यावी.

Comments
Add Comment

ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल

जामीन न मिळाल्याच्या नैराश्यातून सहा बार डान्सर्सचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरातील धक्कादायक घटना! कोल्हापूर: कोल्हापुरातील एका महिला सुधारगृहात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’

मुंबई : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी अखेर

पुणे महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ भरतीसाठी सुधारित जाहिरात

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व