पालघरमध्ये एसटी बससेवेची स्थिती बिकट

नवीन बस पुरवाव्यात अशी सरनाईक यांच्याकडे मागणी


पालघर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.) कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि सेवा सुविधा याबाबत मंगळवारी मंत्रालयात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा सुविधा आणि प्रशासकीय प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. पारस संजय सहाणे यांनी केली. त्याचबरोबर आदिवासी बहुल, ग्रामीण आणि गोरगरीब जनतेचा भाग असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड या दुर्गम भागांमध्ये दळणवळणाचे एकमेव साधन असलेल्या “लालपरी” एस.टी. बससेवेची स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या भागांमध्ये अनेक नागरिक एस.टी. बससेवेवरच अवलंबून असल्याने नवीन बस मंजूर करण्याची तातडीची गरज असल्याचेही ॲड. पारस सहाणे यांनी नमूद केले. परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आदिवासी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणे हे सरकारचे प्राधान्य असून, नागरिकांना चांगली व वेळेवर बससेवा मिळावी यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.

Comments
Add Comment

द. आफ्रिकेविरुद्ध रोहित-विराट खेळणार नाही?

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका; १३ नोव्हेंबरपासून सुरू मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात

द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी 'शुभमन सेना' सज्ज; ऋषभ पंतचे पुनरागमन निश्चित

मुंबई : भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने दक्षिण

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार नेते शशांक राव यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन महापालिका व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी

मालवणी, अंबोजवाडी परिसरात १०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे मालवणी क्षेत्रातील न.भू.क्र. २६७० व १९१६ या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात

शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, अतुल देशमुखसह अनेक जण शिवसेनेत दाखल

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर होताच

मिचेल सँटनर, जेकब डफीची विक्रमी भागीदारी

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. जिथे पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू झाली आहे.