जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी

पालकमंत्री नितेश राणेंकडून विभागनिहाय आढावा
निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्याचे निर्देश


वितरीत निधींपैकी विकास क्षेत्रनिहाय काही प्रमुख विभाग व त्यांचे निधी वितरण

कृषी व संलग्न सेवा - ७.०१ कोटी
ग्रामविकास विभाग - १२.०८ कोटी
पाटबंधारे व पुरनियंत्रण - २.४० कोटी
ऊर्जा विकास - ३.९० कोटी
परिवहन विकास- ११.६१ कोटी
सामान्य आर्थिक सेवा - ४.६४ कोटी
शिक्षण विभाग - २.८३ कोटी
तंत्रशिक्षण विभाग- ४५.०० लक्ष
क्रीडा व युवक कल्याण - १२.०४ लक्ष
वैद्यकीय शिक्षण विभाग-६०.०० लक्ष
सार्वजनिक आरोग्य विभाग-१.८० कोटी
नगर विकास विभाग - ३.१७ कोटी
महिला व बालविकास विभाग -९४.०० लक्ष
व्यवसाय शिक्षण विभाग - ३३.७३ लक्ष
सामान्य सेवा - ६.२१ कोटी.



सिंधुदुर्गनगरी :जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता सन २०२५-२६ करीता २८२.०० कोटी रुपयांचा नियतव्यय शासनस्तरावरून मंजूर झालेला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्ययापैकी ३० टक्के रक्कम म्हणजेच ८४.६० कोटी रुपये १ ऑगस्ट २०२५ रोजी प्राप्त झालेले होते. जिल्हा नियोजन समितीकडून १५ ऑक्टोबरपर्यन्त १५१.३० कोटी रुपये रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीस प्राप्त ८४.६० कोटी रुपये निधीपैकी ५८.२६ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च व्हावा यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे प्रत्येक यंत्रणा निहाय आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील निधी वितरणाची टक्केवारी ६८.८७ एवढी आहे. राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांना प्राप्त ३० टक्के निधीपैकी यंत्रणाना निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे.


पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीकडून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आलेल्या असून प्रशासकीय मान्यतेची व निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे.


Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण