पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार नागरिकांच्या पुनर्वसनासाठी रिलायन्स फाउंडेशनने एक व्यापक मदत मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांना अन्न, पाणी, औषधं, आणि जनावरांसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.

पूर ओसरताच रिलायन्स फाउंडेशनचे स्वयंसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वाधिक फटका बसलेल्या भागांची पाहणी करून, त्या ठिकाणी काय आवश्यक आहे, हे समजून घेतले. यानंतर रिलायन्स रिटेलच्या सहाय्याने अन्न, वस्त्र, आणि जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

पशुधनाचे संरक्षण


पूरानंतर जनावरांमध्ये रोगांचा धोका लक्षात घेता, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हॅमोरॅजिक सेप्टीसेमिया आणि ब्लॅक क्वार्टर या रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी सुमारे २२,००० जनावरांना लस देण्यात आली. यासोबतच प्रभावित भागांतील शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटपही करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील गोठ्यांमध्ये जनावरांसह राहत असलेल्या नागरिकांसाठीही अशीच वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.

अन्न आणि आरोग्य सुविधा उपलब्ध


पूरग्रस्त कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये, रिलायन्स फाउंडेशनने सामुदायिक स्वयंपाकगृहे चालू करून ताजे आणि पौष्टिक अन्न पुरवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेऊन, खराब झालेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रणांची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित केल्या गेल्या.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी दरम्यान आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि औषधांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या जीवनसत्त्वांचा पुरवठाही केला जात आहे.

“मध्य महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहून आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील नागरिकांचे आयुष्य पुन्हा मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असे रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.

रिलायन्स फाउंडेशनने याआधीही पंजाब, आसाम, उत्तराखंडसह इतर राज्यांतील नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. संकटाच्या वेळी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गरजेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य