पर्यावरणाची काळजी घेत आणि सुरक्षिततेचे नियम पाळत कशी कराल साजरी दीपावली

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी आपल्या अवतीभवतीच्या पर्यावरणाचाही सजगपणे विचार करावा. तसेच दिवाळीत फटावे उडविताना तथा फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. यासोबतच फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही, याबाबत मुंबईकरांनी दक्ष रहावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.


प्रकाशाचा सण, सणांचा राजा, दीपोत्सव अशी ओळख असणारा दिवाळीचा सण मुंबईकरांनी अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. तसेच दिवे लावताना व फटाके फोडताना आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विशेष करुन लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छांसह करण्यात येत आहे.


काही वेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. दीपावलीचा सण हा सर्वांसाठी आनंददायी, सुरक्षित व पर्यावरणपूरकरितीने साजरा करणे हे सामाजिक हिताचे आहे, अशी नम्र विनंती मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.



फटाके फोडताना/उडवितांना घ्यावयाची काळजी


१. सुती कपडे परिधान करावेत.
२. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत. मुले फटाके फोडतांना मोठ्यांनी सोबत रहावे.
३. फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.
४. फटाके फोडताना / उडवताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व कोणाला भाजल्यास तात्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
५. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजीचा वापर करावा.



फटाके फोडताना/उडविताना पुढील बाबी टाळाव्यात


१. इमारतीत व जिन्यावर, तसेच टेरेसवर फटाके फोडू नयेत.
२. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.
३. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.
४. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
५. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनांजवळ, वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
६. घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोशणाई करताना अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार (ओव्हरलोड) होणार नाही, याची काळजी घ्यावी.

Comments
Add Comment

घाटकोपरमध्ये भरदिवसा दरोडा : सराफाच्या दुकानावर चाकूने हल्ला करून सोन्याची लूट, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : घाटकोपरमधील अमृत नगर परिसरात आज सकाळी (१५ ऑक्टोबर) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून

Shivsena vs Sadavatre : ब्रेकिंग! एसटी बँकेत भर बैठकीत राडा, बाटल्या फेकल्या; सदावर्ते आणि शिंदे गटात तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC)

महापालिकेच्या ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी, गुरुवार १६ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू

मुंबई (खास प्रतिनिधी) : विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६

सोशल मीडियातील चूक 'येवले अमृततुल्य'ला भोवणार ?

मुंबई : 'येवले अमृततुल्य' या चहाच्या कंपनीने त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी विनापरवानगी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती, पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर

मेट्रो १ ताब्यात घेण्याच्या एमएमआरडीएच्या हालचाली

मार्गिकेचे सखोल निरीक्षण करणार मुंबई : मुंबईतील सर्वात पहिली मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) ताब्यात