महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर! मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ!


महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बैठकीत मंत्री नितेश राणे यांची घोषणा



मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.


या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी दीपावली सणानिमित्त महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹५०,०००/- इतके सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली. तसेच मंडळात बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना प्रथमच प्रत्येकी ₹२०,०००/- इतके सानुग्रह अनुदान देण्याची ऐतिहासिक घोषणा देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.


या निर्णयामुळे महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दीपावली सणाचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला असून या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी यावेळी मंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच मंडळाच्या कार्यक्षमतेत सातत्याने वाढ घडवून आणण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.

Comments
Add Comment

मुंबईतील बीएमसी शाळांमधील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड मोफत देणार

खासदार पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई : उत्तर मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सर्वांगीण शैक्षणिक सुविधा

मुंबईतील ४ हजार ५०० स्वयंसेविकांनी नाकारले निवडणुकीचे काम

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका (सीएचव्ही)

मेट्रो - ८ च्या आराखड्याला मंजुरी

मुंबई, नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास होणार सुसाट मुंबई : मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत.

संसदेचे आजपासून हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान होणार आहे. तत्पुर्वी, रविवारी राजधानी दिल्लीत

२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी राहणार सरकारी कार्यालये बंद?

मुंबई : काहीच दिवसांत २०२५ वर्ष निरोप घेईल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२६

मुंबईतील १६ भूखंडांचा ई लिलाव होणार

शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांचा समावेश मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच मुंबईतील