Stock Market Update: शेअर बाजारात धुळधाण ! सेल ऑफ सह अस्थिरता VIX निर्देशांक १०.७३% गुंतवणूकदारांना अस्थिरतेचा फटका

मोहित सोमण: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारासाठी सकारात्मक होता. परिणामी निर्देशांकात मोठी रॅली झाल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व घरगुती गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक राखली गेली. मात्र युएसकडून आणखी अतिरिक्त १००% टॅरिफ ला वल्याचा फटका शेअर बाजारात बसला. विशेषतः आज अस्थिरता निर्देशांकाने १०.७३% उसळल्याने ही पडझड होत आहे. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलातही सगळ्याच निर्देशांकात घसरण झाल्याने आज गिफ्ट निफ्टीसह इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३१०.७२ अंकाने व निफ्टी ८३.७० अंकांने कोसळला होता. बाजारात मोठ्या प्रमाणात सेल ऑफ सुरू राहिल्याने आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये विशेषतः फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. बँक निर्देशांकातही घसर ण झाल्याने सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.३९%),फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.२२%), पीएसयु बँक (०.१८%) निर्देशांकात किरकोळ झालेली वाढ वगळता इतर निर्देशांकात घसरण झा ली. सर्वाधिक पडझड तेल व गॅस (०.७९%),आयटी (०.७८%), मेटल (०.५९%), आयटी (०.७८%) निर्देशांकात झाली.


सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ सीई इन्फोसिस्टिम (७.५४%), ज्युबिलंट एनग्रेव्ह (४.१९%), केफिन टेक्नॉलॉजी (३.६७%), एथर एनर्जी (२.९९%), युटीआय एएमसी (२.७९%), फोर्टिस हेल्थ (२.६६%), सारेगामा इंडिया (२.३४%), एचडीएफसी एएमसी (२.२ ६%), बजाज ऑटो (१.२३%), जेएम फायनांशियल (१.१९%), आदित्य एएमसी (०.९०%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (०.८३%), भारती एअरटेल (०.७९%), सिटी युनियन बँक (०.७५%) समभागात झाली आहे.


सुरूवातीच्या कलात सर्वाधिक घसरण बीएलएस इंटरनॅशनल (१२.१३%), रिलायन्स पॉवर (५%), रेडिंगटन (३.३६%), सीपीसीएल (२.३५%), टाटा कम्युनिकेशन (२.२८%), ज्योती सीएनसी ऑटो (२.२२%), सिमेन्स (२.०६%), एल टी फूडस (२%), गोदरेज इंड स्ट्रीज (१.९२%), एनएमडीसी स्टील (१.८५%), ब्रेनबीज सोलूशन (१.८२%), झेंसार टेक्नॉलॉजी (१.८१%), बलरामपूर चिनी (१.८०%), एल अँड टी टेक्नॉलॉजी (१.८३%),आयटीआय (१.७८%), पतांजली फूड (१.७७%), भारत डायनामिक्स (१.७६%), डीसीएम श्री राम (१.७५%), ग्राविटा इंडिया (१.७५%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

आग्रा : ताजमहाल परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग

आग्रा : जगातील सात आश्चर्यांमध्ये ज्या स्मारकाचा समावेश केला जातो त्या ताजमहालच्या परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग

GST Update: GSTR-9 फॉर्म भरण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत

प्रतिनिधी:आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी फॉर्म GSTR-९ वापरून वार्षिक रिटर्न ऑनलाइन भरण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) पोर्टल

SIP SWP Investment Explainer: आयुष्याची आर्थिक तरतूद करताय? तर SIP SWP हवाच ! वर्तमान भविष्य गुंतवणूकीतून कसे सुरक्षित कराल वाचा एकाच क्लिकवर

मोहित सोमण:तुमचा वर्तमान तुमचे भविष्य आर्थिक नियोजनासह शक्य आहे. पैशाची चणचण भासली म्हणून सरतेशेवटी हातात पुंजी

MOFSL Stock to buy today: दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी मोतीलाल ओसवालकडून 'या' ३ शेअर खरेदीचा सल्ला 'या' Target Price सह वाचा विश्लेषणासहित ...

मोहित सोमण:मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने आज Top Stock Picks ची शिफारस गुंतवणूकदारांना आपल्या अहवालातून केली आहे.

मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी

मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय

Tata Capital Share Listing: टाटा कॅपिटल आयपीओची निराशाजनक कामगिरी! केवळ १.२३% प्रिमियमसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला, हा शेअर खरेदी करावा? जाणून घ्या

मोहित सोमण:टाटा कॅपिटल लिमिटेड (Tata Capital Limited) आयपीओची निराशाजनक कामगिरी स्पष्ट झाली आहे. आज कंपनीचा शेअर बाजारात