Linkedin open to work feature: प्रोफेशनल्‍ससाठी लिंक्‍डइनवर नोटीस कालावधी आणि अपेक्षित वार्षिक वेतनाचे फिचर उपलब्ध

प्रतिनिधी: लिंक्‍डइनच्‍या (LinkedIn) 'ओपन टू वर्क' वैशिष्‍ट्याने दीर्घकाळापासून प्रोफेशनल्‍सना त्‍यांच्‍या पुढील संधीसाठी ते कधी सज्‍ज असतील हे ओळखण्‍यास मदत केली आहे. जागतिक स्‍तरावर प्‍लॅटफॉर्मवरील 'ओपन टू वर्क' वैशिष्‍ट्याचा वापर करणारे ८ ५% प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की, त्‍यांना त्‍यांच्‍या कनेक्‍शन्‍सकडून मदत किंवा प्रोत्‍साहन मिळाले आहे. यामधून प्रेरणा घेत लिंक्‍डइन अपडेट्स सादर करत आहे, जे सदस्‍यांना त्‍यांच्‍या रोजगार शोधामध्‍ये अधिक नियंत्रण व पारदर्शकता देतात. 'ओपन टू वर्क' वैशिष्‍ट्या चा वापर करताना सदस्‍य आता ते नवीन नोकरीवर सामील होण्‍यास कधी उपलब्‍ध आहेत हे दाखवण्‍यासाठी त्‍यांचा नोटीस कालावधी आणि कामाच्‍या मोबदल्यासंदर्भात अपेक्षित वार्षिक वेतन समाविष्‍ट करू शकतात. ही पर्यायी क्षेत्रे प्रोफेशनल्‍सना सुरूवातीपासू न स्‍पष्‍टता देतात, ज्‍यामुळे विसंगत संवाद टाळण्‍यास मदत होते. सदस्‍याचा 'ओपन टू वर्क' बॅज सार्वजनिक स्‍तरावर दृश्‍यमान असला तरी ही माहिती फक्‍त रिक्रूटर्सना दिसते.


लिंक्‍डइन इंडियाच्‍या टॅलेंट अँड लर्निंग सोल्‍यूशन्‍सच्‍या प्रमुख रूची आनंद (Ruchee Anand, Head of Talent and Learning Solutions, LinkedIn India) म्‍हणाल्‍या आहेत की, वाहतूकीच्‍या सिग्‍नलप्रमाणे प्रोफेशनल्‍सनी पाठवलेले लाल, पिवळा व हिरवा सिग्‍नल्‍स त्‍यांच्‍या करिअरला पुढे घेऊन जाण्‍यामध्‍ये फरक घडवून आणू शकतात. कसे ते पुढीलप्रमाणे:


लाल सिग्‍नल: थांबा आणि विचार करा: योग्‍य प्रक्रिया होत नाही हे रिक्रूटर्सना लक्षात येते. संदर्भाशिवाय तफावत किंवा बाहेर पडणे, सुरुवातीच्या संपर्कानंतर घोस्टिंग करणे किंवा अनेक ऑफर गृहीत धरणे म्हणजे तुम्हाला गुंतण्याची गरज नाही - हे चुकीचे संदे श पाठवते. तुमच्या प्रोफाइलमध्ये काम सोडण्‍यामागील कारण, करिअरमधील बदल किंवा ब्रेक्सबद्दल लहान स्पष्टीकरण समाविष्‍ट केल्‍याने तुमचे म्‍हणणे प्रामाणिकपणे सांगण्‍यास मदत होते.


पिवळा सिग्‍नल: स्‍पष्‍टतेसह पुढे जा: टाइमलाइन व वेतनाबाबत स्‍पष्‍टपणे सांगण्‍यासोबत कौशल्‍ये दाखवणे देखील महत्त्वाचे आहे. जागतिक स्‍तरावर ४२ टक्‍के रिक्रूटर्स दर आठवड्याला लिंक्‍डइनवर स्किल्‍स फिल्‍टरचा वापर करणाऱ्या उमेवारांचा शोध घेतात.अ से असताना देखील स्किल्‍स विभागाकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे काही पात्र प्रोफाइल्‍स चुकतात. तुम्‍ही पाच किंवा अधिक कौशल्‍ये पोस्‍ट केल्‍यास रिक्रूटर्स लिंक्‍डइन प्रोफाइल्‍स पाहण्‍याची शक्‍यता ५.६ पटीहून अधिक आहे.


हिरवा सिग्‍नल:आत्‍मविश्वासाने पुढे जा: दिशा मिळाल्‍यास रिक्रूटर्स आत्‍मविश्वासाने पुढे जातात. इच्छित भूमिका निर्धारित केलेल्‍या, प्रमुख माहितीसह प्रोफाइल्‍स अपडेट केलेल्‍या आणि 'ओपन टू वर्क'चा वापर करणाऱ्या उमेदवारांना कॉलबॅक मिळण्‍याची शक्‍यता जास्‍त आहे. खरेतर, 'ओपन टू वर्क' वैशिष्‍ट्याचा वापर केल्‍याने प्रोफेशनल्‍सना रिक्रूटरकडून संदेश मिळण्‍याची शक्‍यता दुप्‍पट असू शकते.


ओपन टू वर्क बॅजचा वापर करत रिक्रूटर्सना कशाप्रकारे योग्‍य सिग्‍नल्‍स पाठवावे:


पायरी १: तुमच्‍या लिंक्‍डइन प्रोफाइलवर जा, 'ओपन टू'वर क्लिक करा आणि 'फाइण्डिंग ए न्‍यू जॉब'ची निवड करा.



पायरी २: तुम्‍हाला कोणत्‍या प्रकारचे काम पाहिजे याबाबत माहिती सांगण्‍यासाठी तुमचा पसंतीचा जॉब टायटल (टायटल्‍स) प्रविष्‍ट करा.



पायरी ३: तुम्‍ही नवीन नोकरीसाठी कधी उपलब्‍ध असाल हे दाखवण्‍यासाठी तुमचा नोटीस कालावधी प्रविष्‍ट करा (फक्‍त रिक्रूटर्सना दिसेल).



पायरी ४: तुमच्‍या इच्छित कामाच्‍या मोबदल्याबाबत सांगण्‍यासाठी अपेक्षित वार्षिक वेतनाचा उल्‍लेख करा (फक्‍त रिक्रूटर्सना दिसेल).



पायरी ५: शेवटचे म्‍हणजे, रिक्रूटर्स ओन्‍ली किंवा ऑल लिंक्‍डइन मेम्‍बर्ससह शेअर करण्‍याबाबत निवड करत तुमचा 'ओपन टू वर्क' बॅज कोण पाहू शकतो यावर नियंत्रण ठेवा. 'रिक्रूटर्स ओन्‍ली' निवडल्‍याने प्‍लॅटफॉर्मवरील तुमच्‍या संपूर्ण नेटवर्कला दक्ष न करता तुम्‍ही रिक्रूटर्सच्‍या रडारवर राहण्‍यास मदत होऊ शकते.


Comments
Add Comment

सप्टेंबरमध्ये चीनची अमेरिकेतील निर्यात घटली, मात्र चीनी जागतिक शिपमेंट सहा महिन्यांच्या उच्चांकावर

प्रतिनिधी:सप्टेंबरमध्ये चीनची अमेरिकेतील निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २७% घसरली आहे. जरी जागतिक निर्यातीत

आग्रा : ताजमहाल परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग

आग्रा : जगातील सात आश्चर्यांमध्ये ज्या स्मारकाचा समावेश केला जातो त्या ताजमहालच्या परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग

GST Update: GSTR-9 फॉर्म भरण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत

प्रतिनिधी:आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी फॉर्म GSTR-९ वापरून वार्षिक रिटर्न ऑनलाइन भरण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) पोर्टल

SIP SWP Investment Explainer: आयुष्याची आर्थिक तरतूद करताय? तर SIP SWP हवाच ! वर्तमान भविष्य गुंतवणूकीतून कसे सुरक्षित कराल वाचा एकाच क्लिकवर

मोहित सोमण:तुमचा वर्तमान तुमचे भविष्य आर्थिक नियोजनासह शक्य आहे. पैशाची चणचण भासली म्हणून सरतेशेवटी हातात पुंजी

MOFSL Stock to buy today: दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी मोतीलाल ओसवालकडून 'या' ३ शेअर खरेदीचा सल्ला 'या' Target Price सह वाचा विश्लेषणासहित ...

मोहित सोमण:मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने आज Top Stock Picks ची शिफारस गुंतवणूकदारांना आपल्या अहवालातून केली आहे.

मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी

मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय