भायखळा वस्र संग्रहालय ठरणार आता नवीन पर्यटन स्थळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : संस्कृती, इतिहास आणि आधुनिकतेचा अनोखा संगम असलेले मुंबई महानगर देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या चैतन्यपूर्ण नगरीत पर्यटकांना सुखद आणि अविस्मरणीय अनुभव मिळावा, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. पर्यटकांना दर्जेदार व सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यास महानगरपालिका कटिबद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाशी समन्वय साधून अधिक सुविधा विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पर्यटक मार्गदर्शन आणि सहकार्य यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. व्‍यवसाय सुलभता धोरणांतर्गत चित्रपटांच्‍या चित्रीकरणासाठी 'एक खिडकी योजने'द्वारे परवानग्‍या दिल्‍या जात आहेत. भायखळा येथे १५ एकर जागेवर वस्‍त्र संग्रहालय उभारले जात आहे. त्‍यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्‍वासदेखील गगराणी यांनी व्‍यक्‍त केला.


महाराष्‍ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिका यांची 'मुंबई पर्यटन' या विषयावर संयुक्‍त बैठक महानगरपालिका मुख्‍यालयात सोमवारी १३ ऑक्‍टोबर २०२५ रोजी संपन्‍न झाली. त्‍यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी बोलत होते. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त डॉ. अश्विनी जोशी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. भगवंतराव पाटील, महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक निलेश गटणे, महाव्‍यवस्‍थापक चंद्रशेखर जैस्‍वाल, महानगरपालिकेचे उपायुक्‍त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उपायुक्‍त (उद्याने) अजितकुमार आंबी, व्‍यवसाय विकास विभागाच्‍या प्रमुख शशी बाला, कार्यकारी अभियंता (मुख्‍यालय) संजय आढाव यांच्‍यासह संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी मुंबई पर्यटन याविषयी सादरीकरण केले.


महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी म्‍हणाले की, मुंबईकरांना मूलभूत सेवासुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्‍य आहे. त्‍याचबरोबर पर्यटनविषयक अनुषंगिक कामे, पर्यटन प्रचारदेखील महानगरपालिकेमार्फत केला जात आहे. मुंबई महानगरात पर्यटनाची मोठी क्षमता, सामर्थ्‍य आहे. पर्यटक आकर्षित व्‍हावेत, पर्यटनाला चालना मिळावी, यादृष्‍टीने महानगरपालिका विविध पावले उचलत आहे. महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या सहकार्याने आणि समन्‍वयाने त्यात आणखी सुधारणा करण्‍यात येतील, असेही गगराणी यांनी नमूद केले.


पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे म्‍हणाले की, राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन आणि विकास देण्यासाठी महाराष्ट्र शासन समर्पित आहे. पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवणे, धोरणात्मक योजना तयार करणे आणि शाश्वत पर्यटन उपक्रम राबविणे हे पर्यटन विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीगणेशोत्सव आणि हिंदवी स्वराज्य महोत्सव यांसारखे सांस्कृतिक, ऐतिहासिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करून पर्यटन विभागाने महाराष्ट्राचा अद्वितीय वारसा आणि चैतन्यशील संस्कृती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. अजिंठा आणि वेरूळ लेणी यासारखी युनेस्कोची जागतिक वारसा स्थळे, माथेरान आणि लोणावळा सारखी नयनरम्य गिरीस्‍थानके, मुंबईसारखे गजबजलेले महानगर यासारख्या पर्यटन स्थळांचा समृद्ध संग्रह आहे. इको-टुरिझम, साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था विशेषत: महानगरपालिकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. त्‍याची सुरूवात महानगरपालिकेकडून व्‍हावी, ही अपेक्षा आहे. पर्यटनवाढीसाठी पर्यायाने अर्थव्‍यवस्‍था वाढीसाठी मुंबईच्या क्षमतेचा उपयोग करणे आवश्‍यक आहे. मुंबई महानगरपालिकेने याकामी सकारात्‍मक सहकार्य करावे, असेदेखील पाटणे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Breaking News : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या 2026 च्या तारखा जाहीर!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी

मुंबई मेट्रो-३ साठी WhatsApp तिकीट सेवा सुरू; आता ॲपची गरज नाही!

'हाय' मेसेज करा आणि QR तिकीट मिळवा; MMRC चा प्रवाशांना 'स्मार्ट' दिलासा मुंबई: मुंबईतील लोकल प्रवाशांची सोय लक्षात घेऊन

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस, संप टळला!

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. मात्र,

Mumbai Politics : राऊत नेमके काय म्हणाले? राऊतांच्या 'त्या' विधानाने ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा?

राऊतांच्या 'त्या' विधानावर मनसे नेत्यांची तीव्र नाराजी; मनसे 'शिवतीर्थ'वर आक्रमक! मुंबई: ठाकरे बंधू म्हणजेच

घाटकोपरमधील गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्कला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात असलेल्या गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क या नामांकित व्यावसायिक इमारतीत आज

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' तांत्रिक बिघाडामुळे मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पाणीटंचाईचं संकट! मुंबई, ठाणे आणि भिवंडीच्या काही भागांना फटका, नागरिकांनी पाणी जपून वापरा मुंबई: मुंबईसह