सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांची सूचना


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ले हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने अत्याधुनिक एआयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे उपस्थितीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई येथे बैठक पार पडली.


पोलीस ठाणे हद्दीतील विविध बंदर व जेटीवरील जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजासाठी ये-जा करत असतात. त्यामुळे बंदर परिसरातील हद्दीत संशयीत दहशतवादी व गुन्हेगार लपून बसण्याची शक्यता असल्याने सागरी सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देवगड, मालवण आणि वेंगुर्ले पोलीस ठाणे परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एआय युक्त सीसीटीव्ही सर्वेलन्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी देवगड पोलीस ठाणे येथे ४,५९,९५,८३५ रुपये, आचरा पोलीस ठाणे ३,७४,६३,६१३ रुपये, विजयदुर्ग पोलीस ठाणे २,८७,९८,१२१ रुपये, मालवण पोलीस ठाणे ४,५८,७७,७८३ रुपये, निवती पोलीस ठाणे ४,४६,२३,६८० रुपये आणि वेंगुर्ला पोलीस ठाणे ४,५५,४७,१३६ रुपये, एवढी अंदाजे रक्कम अपेक्षित आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेची बाब लक्षात घेता संबंधित पोलीस ठाणे हद्दीत लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याच्या सूचना या बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर एकूण ९२ लँडिंग पॉईंट्स असून या सर्व ठिकाणी पोलीस यंत्रणा अथवा सुरक्षा दल अधिकारी ठेवणे शक्य नाही. अशा ठिकाणी बंदर व जेटीवरील जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजाच्या दृष्टीने येत असतात. त्यातून समाज विघातक व संशयित दहशतवादी गुन्हेगार आदी येऊन लपून बसण्याची व राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त सीसीटीव्ही सर्वेलन्स यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठकीत दिली.

Comments
Add Comment

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज २०२५चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. यंदाचा

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव! धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

धुळे :जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा