जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. या अचानक खंडित झालेल्या आरोग्यसेवेमुळे शहरातील नागरिक, विशेषतः आदिवासी वस्त्यांतील महिला वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गोरवाडी, हनुमान पॉईंट, नवापाडा, महादेवआळी, जांभूळविहीर आदी केंद्रांमध्ये ही सेवा बंद पडली असून, या भागांतील बहुसंख्य महिला आदिवासी समाजातील आहेत. नियमित लसीकरण आणि आरोग्य तपासणी बंद झाल्याने गरोदर माता व नवजात बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


आरोग्य विभागाकडून नर्स व आरोग्य कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर नवीन नियुक्ती न झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. परिणामी, महिलांना आता लसीकरणासाठी शहरातील इतर केंद्रांपर्यंत लांबचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनेक माता वेळेवर लसीकरण न करता राहतात आणि बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर युवा आदिवासी संघ, जव्हार यांच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप माळी यांच्या नेतृत्वाखाली पतंगशहा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात,“गरोदर माता व बालकांसाठी असलेली ही आरोग्यसेवा तातडीने सुरू करण्यात यावी आणि बंद असलेल्या केंद्रांवर नवीन नर्सची त्वरित नियुक्ती करावी,”अशी मागणी करण्यात आली आहे...


संदीप माळी यांनी सांगितले की,“ही सेवा ग्रामीण व शहरी दोन्ही भागांसाठी अत्यावश्यक आहे. प्रशासनाने तातडीने कृती केली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला जाईल.” निवेदन सादरीकरणावेळी कार्याध्यक्ष कपिल वाढू, सचिव रमेश कोरडा, उपाध्यक्ष सुनील जाबर, माजी कार्याध्यक्ष विनू दादा मौळे, माजी अध्यक्ष महेश भोये, धीरज घुलम, दिपक गावंढा, कल्पेश भोगाडे, सामाजिक कार्यकर्ते चेतन कव्हा, हितेश जाधव, तसेच मदतनीस नेत्रा वांगड, रेणुका गरेल, पुनम गोरे, ज्योत्स्ना वारघडे, आणि पत्रकार प्रमोद मौळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर येत्या काही दिवसांत ही सेवा पुन्हा सुरू झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. दरम्यान, या प्रकरणाकडे आरोग्य विभागाने गंभीरतेने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

वाडा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

कुडूस  : वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत ही

वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

विरारमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पालिकेच्या गार्डनमध्ये दुर्घटना

विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११