‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदल


मुंबई  : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा – दहिसर पूर्व ते काशीगाव) शी जोडण्याच्या कामासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या हाती घेण्यात येत आहेत. या कारणास्तव १२ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मेट्रो मार्गिका २ ए (दहिसर पूर्व–डी.एन.नगर) व मेट्रो मार्गिका ७ या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा सुरू होतील.


ही तात्पुरती वेळापत्रकातील सुधारणा “लाल मार्गिका विस्तार” या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा असून, अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान अखंड व सुसंगत प्रवासासाठी अत्यावश्यक आहे. सध्या मेट्रो मार्गिका ७ वर १३ स्थानकांदरम्यान सेवा सुरू असून, मार्गिका ७ ची विस्तारित मार्गिका ९ चे काम अंतिम टप्प्यात आहे. आरडीएसओची तपासणी २३ सप्टेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आयएसए चाचण्या आणि ट्रायल रन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुंदवली ते काशीगाव (लाईन ९) दरम्यान ट्रायल रन घेण्यात येतील. त्यामुळे सकाळी ५.२५ वाजता सुरू होणाऱ्या मेट्रो सेवात सुधारित वेळापत्रक लागू राहील, असे महा मुंबई मेट्रोमार्फत स्पष्ट करण्यात आले.


प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना मुंबई वन ॲप, महा मुंबई मेट्रोचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स व स्थानकावरील माहिती फलक यांवर उपलब्ध अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महा मुंबई मेट्रो तर्फे सर्व प्रवाशांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत असून, हे प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा) कार्यान्वयनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहेत. लवकरच गुंदवली ते मिरा गाव दरम्यान थेट, सुसंगत आणि अखंड मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून, पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती